मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटात होणार मोठा पक्षप्रवेश, ताकद वाढणार

शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी भाजपला धक्का दिला आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटात होणार मोठा पक्षप्रवेश, ताकद वाढणार
भाजपला मोठा झटका
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 7:52 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. परंतु हे यश मविआला विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, राज्यात महायुतीचं सरकार आलं. दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. सर्वाधिक पक्षप्रवेश हे शिवसेना शिंदे गटात झाल्याचं दिसून येत आहे. तर या पक्ष प्रवेशाचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा सर्वात मोठा धक्का होता. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आता थेट भाजपलाच धक्का दिला आहे. सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पक्ष प्रवेशाचा  मुहूर्त अखेर ठरला आहे. शेखर गोरे हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. 1 सप्टेंबर रोजी शेखर गोरे हे मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Loading...

अनेक दिवसांपासून नाराज 

समोर आलेल्या माहितीप्रमाणे  विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना शब्द दिला होता. मात्र हा शब्द पाळला न गेल्यामुळे शेखर गोरे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. अखेर त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, एक सप्टेंबर रोजी शेखर गोरे हे मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शेखर गोरे यांच्या भूमिकेमुळे माण तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं बळ मिळणार आहे, मात्र दुसरीकडे हा मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी अनेकांनी शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us