जयंत पाटलांसमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, फ्री स्टाईल हाणामारी, वाचा नेमकं काय घडलं ?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले (Dispute between NCP party workers in Dhule).

जयंत पाटलांसमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, फ्री स्टाईल हाणामारी, वाचा नेमकं काय घडलं ?
| Updated on: Feb 09, 2021 | 10:28 PM

धुळे : खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी बघायला मिळाली. या हाणामारीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, राष्ट्रवादीतील ही गटबाजी धुळेकरांसाठी नवी नाही (Dispute between NCP party workers in Dhule).

माजी आमदार अनिल गोटे यांचे समर्थक आणि इतर गटाच्या समर्थकांमधील गटबाजी असल्याचं धुळ्यात सर्वश्रूत आहे. धुळ्यात मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत काही विषयांवरुन कुजबूज सुरु झाली. या कुजबूजवरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झालं (Dispute between NCP party workers in Dhule).

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला. प्रदेशाध्यश्र जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड 3 फेब्रुवारीला विदर्भ दौऱ्यावर होती. ही यात्रा आज खान्देशात पोहोचली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद यात्रेच्या माध्यमातून आज संध्याकाळी धुळ्यातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. या कार्यक्रमानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि संबंध आणखी दृढ होतील, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि संबंध वाढण्याऐवजी प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.