मोठी बातमी! भाजप शिवसेना ठाकरे गटात जोरदार राडा, फ्री स्टाईल हाणामारी, 80 जणांविरोधात गुन्हा दाखल
मोठी बातमी समोर येत आहे, टिटवळा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत जोरदार राडा झाला आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटा आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी या प्रकरणात 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, टिटवळा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत जोरदार राडा झाला आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. वादाचं रुपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे जाण्याच्या वादातून हा राडा झाला आहे. भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका उपेक्षा भोईर, त्यांचे पती शक्तिवान भोईर तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि पदाधिकारी प्रदीप भोईर यांच्यात मिरवणुकीत पुढे जाण्यावरून वाद झाला. त्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, टिटवाळ्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे जाण्याच्या वादातून जोरदार राडा झाला आहे, भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर या वादाचं रूपांतर धक्काबुक्की, माहाण आणि गोंधळात झालं. भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका उपेक्षा भोईर, त्यांचे पती शक्तिवान भोईर तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि पदाधिकारी प्रदीप भोईर यांच्यामध्ये मिरवणुकीत पुढे जाण्यावरून वाद झाला, आणि या वादानंतर घटनास्थळी धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी चौघांसह दोन्ही गटातील 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणे, दंगल घडवणे, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाणीच्या कलमांसह गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच ध्वनीक्षेपकाची आवश्यक परवानगी न घेता मिरवणूक काढणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, टिटवाळा परिसरात उपेक्षा भोईर यांच्या पॅनलविरोधात निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे प्रदीप भोईर यांचा पराभव झाला होता; त्यानंतर आता गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. या ठिकाणी जोरदार राडा पहायला मिळाला, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, 70 ते 80 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.