Shiv Sena | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन गट आमनेसामने, चंद्रपुरात राडा

| Updated on: Mar 01, 2023 | 12:04 AM

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी हाकलून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.

Shiv Sena | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन गट आमनेसामने, चंद्रपुरात राडा
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी हाकलून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या शिवसेनेची शिवगर्जना यात्रा सुरु आहे. या यात्रेनिमित्त चंद्रकांत खैरे यांची वरोरा शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा दुपारी तीन वाजता निर्धारित करण्यात आली होती. मात्र त्याआधी भद्रावती शहरात खैरे यांची एक सभा आयोजित करण्यात आली.

वरोरा येथील सभेच्या आधी भद्रावती शहरात सभा का आयोजित करण्यात आली? यासाठी शिवसेना कार्यकर्ते नाराज होते. खैरे यांना भद्रावती येथील सभेत उशीर होत असल्याने त्यांनी आपल्या सभेत असलेल्या शिवसेनेच्या बाकी पदाधिकाऱ्यांना वरोऱ्याकडे रवाना केले. मात्र हे पदाधिकारी वरोरा येथे सभा स्थळी पोहोचताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हाकलून लावले.

सध्या शिवसेनेत जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे आणि वरोरा विधानसभा अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. मुकेश जीवतोडे यांनी वरोरा येथे सभा आयोजित केली होती. तर रवींद्र शिंदे यांनी भद्रावती येथे खैरे यांच्या सभेचे आयोजन केले होते. या दरम्यान सगळा गदारोळ झाला. मात्र चंद्रकांत खैरे वरोरा येथे पोहोचताच त्यांची सभा सुरळीत पार पडली.