AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मातोश्रीवर वातावरण तापलं; दोन गट थेट भिडले, उद्धव ठाकरेही प्रचंड संतापले, नेमकं काय घडलं?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर शिवसेना ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या गटात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! मातोश्रीवर वातावरण तापलं; दोन गट थेट भिडले, उद्धव ठाकरेही प्रचंड संतापले, नेमकं काय घडलं?
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 03, 2026 | 4:52 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या गटात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील  संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज ठाणे आणि कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये ही घटना घडली आहे. दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त करत या पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भांडणाऱ्या आपल्या पदाधिकाऱ्यांना कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापक अभिजीत दिपके यांचं उदाहारण दिलं, देशातील एक तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही भांडतायेत काय? तुमच्या वागण्याला काही अर्थ आहे का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये उपस्थित केला.  दरम्यान या घटनेमुळे काही काळ बैठकीत चांगलंच वातावरण तापल्याचं पहाय मिळालं.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा सर्वात मोठा धक्का होता. दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख तसेच विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख यांची बेैठक घेतली होती.  त्यानंतर त्यांनी आज कल्याण आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून, पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट