पुण्यानंतर मुंबई मेट्रोच्या उद्घटनावरूनही कलगीतुरा? भाजप नेत्यांची मागणी काय?

| Updated on: Feb 22, 2022 | 6:30 PM

आता मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) उद्घाटनावरूनही असाच कलगीतुरा पेटण्याची शक्याता आहे. कारण मुंबईतल्या भाजप नेत्यांची मागणी आता समोर आाली आहे.

पुण्यानंतर मुंबई मेट्रोच्या उद्घटनावरूनही कलगीतुरा? भाजप नेत्यांची मागणी काय?
मोदींच्या हस्ते उद्घाटन करा-भातखळकर
Follow us on

मुंबई : पुण्यातल्या मेट्रोच्या उद्घाटनावरून भाजप नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये रंगलेला वाद महाराष्ट्राने पाहिला आहे. आता मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) उद्घाटनावरूनही असाच कलगीतुरा पेटण्याची शक्याता आहे. कारण मुंबईतल्या भाजप नेत्यांची मागणी आता समोर आाली आहे. मुंबई शहरातील अंधेरी पूर्व व दहिसर पूर्व तसेच अंधेरी पश्चिम व दहिसर पश्चिम या दोन्ही मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या शुभहस्ते करावे अशी मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात अजित पवारांनी पुणे मेट्रोल हिरावा कंदील दाखवल्यानंतर मोदीच मेट्रोचे उद्घाटन करणार असा पवित्रा देवेंद्र फडणवीसांनी घेतला होता. आता मुंबईतही तेच चित्र दिसून येत आहे.

फडणवीस, मोदींना सन्मानाने बोलवा

मुंबई शहराच्या एकात्मिक मेट्रो वाहिन्यांच्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्प चालू करण्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनाही प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने बोलवावे अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेले अनेक मोठे प्रकल्प ज्यांची उद्घाटने गेल्या दोन वर्षात झाली, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना न बोलावून ठाकरे सरकारने आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे.मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलावून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवावा असे ही आ. भातखळकर शेवटी म्हणाले.

पुणे मेट्रोतही असाच वाद

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या हस्ते मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यानंतर फडणवीसांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी मोदींच्या हस्तेच पुणे मेट्रोचं उद्घाटन होईल असं फडणवीस म्हणाले होते. आता मोदी येणार असल्यामुळे भाजची अजित पवारांवरील पुण्यातली कुरघोडी स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्यातील मेट्रोचा पाहणी दौरा आयोजित केला होता. मेट्रोची संपूर्ण माहिती त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. हाच वाद आता मुंबईत पेटण्याची शक्यता आहे.

माझ्या माणसांना भडकवण्याचे धंदे बंद कर, नाही तर घरातून उचलून नेईन; काँग्रेस नेते संजय दत्त यांची कर्मचाऱ्याला दमबाजी

Video | सदावर्तेंकडून राऊतांची नक्कल! ‘नो क्वेशन आन्सर’वर म्हणाले, लाज वाटायली काय?

St Worker : एसटी अहवालावर कोर्टात काय झालं? सदावर्ते आणि सरकारी वकिलांमध्ये काय युक्तीवाद?