पोटात अन्न नाही, दहा मिनिटात नापास केलं, अभिजित दीपकेंपुढे व्यथा मांडताना मुलगा भावुक! जमिनीवर बसून सगळं सांगितलं!

हायकोर्टाच्या ऑनलाईन लिपिक परीक्षेत राज्यभरात विविध सेंटरवर तांत्रिक बिघाडाने हजारो विद्यार्थ्यांना दहा मिनिटात लॉग आऊट करुन अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे संभाजीनगरासह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात स्वत: अभिजित दिपके यांनी संभाजीनगरात जाऊन विद्यार्थ्यांची व्यथा जाणून घेत त्यांच्या सोबत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

पोटात अन्न नाही, दहा मिनिटात नापास केलं, अभिजित दीपकेंपुढे व्यथा मांडताना मुलगा भावुक! जमिनीवर बसून सगळं सांगितलं!
high court clerk exam row
| Updated on: Aug 16, 2026 | 6:12 PM

मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे हा गोंधळ फक्त एका शहरापुरताच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा गोंंधळ उडाल्याचे समोर आले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातही ऑनलाईन परीक्षेत गडबड झाल्याने सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचले. त्यांनी आता परीक्षेच्या ठिकाणीच आंदोलनाची हाक दिली आहे. जोपर्यंत ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं दीपके यांनी सांगून टाकलंय. दरम्यान, ही भूमिका घेण्याआधी दीपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांची अडचण जाणून घेतली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी दीपके यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. एक विद्यार्थी तर चक्क भावूक झाला. दीपके यांच्यापुढे बोलताना त्याचा कंठ दाटून आला…

या संदर्भात अभिजीत दिपके यांनी संभाजीनगरात विद्यार्थ्यांची निदर्शने सुरु होती तेथे जाऊन त्यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी एका विद्यार्थ्याने सांगितले की दरवर्षी कोर्ट जी टायपिगं एक्झाम कंडक्ट करते ती स्वत: करते किंवा जिल्हा न्यायालयात करत असते. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांची जादा संख्या पाहून जिल्हा सत्र न्यायाधीशांनी सेंटर जाहीर केली होती. एक्झाम सेंटर देऊ नका अशी विनंती आम्ही आधीच केली होती. यांच्याकडे बॅकअप डाटा नाही कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही याची आम्हाला माहिती होती असेही या विद्यार्थ्याने सांगितले.

आधीच आम्ही तक्रार केलेली होती.मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. एक्झाम कंडक्ट करणारा हा स्टाफ एरोगंट असतो. एक महिला आम्हाला म्हणाली की आता तुमची परीक्षा होणार नाही, हा अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. न्यायव्यवस्थाच जर विद्यार्थ्यांना न्याय देत नसेल तर आपण न्याय मागायचा कोणाकडे असाही सवाल या विद्यार्थ्याने दीपके यांच्याशी चर्चा करताना केला आहे.

आता सर्वांची ऑफ लाईन एक्झाम घ्यावी

आम्ही बीड,अमरावतीवरुन सकाळी परीक्षेला आलो आहोत. आम्ही जेवलेलो देखील नाही. यांचे कि बोर्ड सगळे बिघडलेले होते आणि शिफ्टचे बटणच नव्हते. त्यामुळे आता आमची रि एक्झाम घ्यावी आणि ऑफ लाईन घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी अभिजीत दीपके यांच्याकडे बोलाताना केली. यावेळी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांना जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी येथेच बसुन आंदोलन करायचे असे विद्यार्थ्यांना सांगितले.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us