Dia Mirza : कोणतेही पैसे घेतले नाहीत तरीही… अमित साटम यांच्या ट्विटनंतर दिया मिर्झाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावलं

Dia Mirza : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एक्सवर एक ट्विट करत अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यावर निशाणा साधला, त्यानंतर दिया हिने देखील अमित साटम यांच्या ट्विटनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं... सध्या सर्वत्र दिया मिर्झा आणि अमित साटम यांची चर्चा सुरु आहे.

Dia Mirza : कोणतेही पैसे घेतले नाहीत तरीही... अमित साटम यांच्या ट्विटनंतर दिया मिर्झाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावलं
| Updated on: Nov 02, 2026 | 12:08 PM

Dia Mirza : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन मुंबई महानगरपालिकेत वादाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, वाढचं प्रदूषण पाहता, महापालिकेने एक मोहिम सुरु केली आहे. यामध्ये अनेक क्रिकेटपटू आणि सिनेविश्वातील कलाकारांचा समावेश आहे. पालिकेकडून अनेक सिने कलाकार जनजागृती करत आहे. यामध्ये अभिनेत्री दिया मिर्झा हिचा देखील एक व्हिडीओ आहे, जो पालिकेकडून डिलिट करण्यात आला आहे. अशात पालिकेला टॅग करत अमित साटम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमच्या पंरपरा संस्कृती खोलवर रुजल्या आहे. दिवाळीबाबत दिया मिर्झाकडून धडे घेण्याची गरज नाही…. असं अमित साटम म्हणाले आहेत.

मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी, यासंदर्भात क्रिकेटपटू आणि सिनेकलाकारांच्या सहाय्याने एक जनजागृती मोहिम राबवली जाते. अनेक सेलिब्रिटींचे यासंदर्भातील व्हिडीओ पालिकेकडून पोस्ट करण्यात आले. त्यामध्ये अभिनेत्री दिया मिर्झा हिचा देखील व्हिडीओ मुंबई मलापालिकेच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आलेला. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत, दिवाळी कशी साजरी करावी याबाबद दिया मिर्झाकडून धडे घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा, संस्कृती खोलवर रुजलेल्या आहे, असं ट्विट साटम यांनी केलं .

Loading...

आता मुंबई पालिकेच्या सोशल मीडियावरून दिया मिर्झा हिचे व्हिडीओ हटवण्यात आला आहेत. यामध्ये अनेक सिनेकलाकार आहेत, माधुरी दीक्षित, महेश कोठारे, शिव ठाकरे, सिद्धार्थ जाधव यांचे सर्वांचे व्हिडीओ त्यामध्ये आहेत. पण दिया मिर्झा हिचाच व्हिडीओ मुंबई महानगर पालिकेकडून हटवण्यात आला आहे. व्हिडीओ का हटवला आहे, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. तर अमित साटम यांना आक्षेप घेतल्यानंतर व्हिडीओ डिलिट करण्यात आला आहे, असं सांगण्यात येत आहे. यावर दिया हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

 

दिया मिर्झा थेटच म्हणाली…

मुंबई महानगरपालिकेने व्हिडीओ डिलिट केल्यानंतर दिया मिर्झा हिने देखील प्रतिक्रिया दिला आहे. “कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. आता तर चांगुलपणाचा जमनाच राहिला नाही.” व्हिडिओ डिलीट केल्यानंतर दिया मिर्झाने सोशल मीडियावर अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर दिया हिची पोस्ट चर्चेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us