AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमाननगरच्या पबमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी, पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच बर्थडे सेलिब्रेशन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पुण्यातील पबच्या पार्किंगमध्ये झालेल्या बर्थडे सेलिब्रेशनची अनेक व्हिडीओ पुढे आली आहेत. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे.

विमाननगरच्या पबमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी, पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच बर्थडे सेलिब्रेशन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
DJ party pune
| Updated on: Aug 05, 2025 | 1:09 PM
Share

शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या “Three Musketeers” या पबच्या पार्किंगमध्ये काही कथित ‘भाई’ लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातला. धक्कादायक म्हणजे या पार्टीत सहभागी झालेले जवळपास सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. या पार्टीचे आता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे सर्व बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना अखेर पुणे पोलिस कुठे होते? असा प्रश्न उपस्थित केला जात असून परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण बघायला मिळतंय.

या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. विशेष म्हणजे फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत (सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा निर्माण करणे) गुन्हा नोंदवलेला आहे आणि ज्या चौकातील पबमध्ये ही पार्टी झाली, त्याच परिसरात त्याने याआधी पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी केली होती.

या पार्टीत नुकताच MCOCA कायद्यातील गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून सुटून आलेला गुन्हेगार आकाश कंचिले देखील त्याच्या टोळीसमवेत उपस्थित होता. ही पार्टी त्याच टोळीचा म्होरक्या निखिल कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. निखिल कांबळे हा येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वीच तो येरवडा जेलमधून सुटून आला आहे.

या डीजे पार्टीमुळे विमाननगर परिसरात प्रचंड चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलिस या प्रकरणात कारवाई करतील का? गुन्हा दाखल केला जाईल का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच ही बर्थडे पार्टी करण्यात आली. बर्थडे करणाऱ्या भाईच्या पेनटरने सर्व व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे काम भाई कडून सुरू असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. आता पोलिस काही कारवाई करणार का? हे देखील पाहण्यासारखे ठरेल.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा