Dmart: अरेरे…चक्क डि-मार्टमध्येच चोरी, तब्बल… सामानाची यादी वाचून चकित व्हाल!

Dmart Theft: डि-मार्टमध्ये नेहमीच गर्दी असते. लोक स्वस्त वस्तू घेण्यासाठी डी-मार्टमध्ये जात असतात. याच डी-मार्टमध्ये आता चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

| Updated on: Aug 15, 2026 | 2:32 PM
1 / 5
डी-मार्टमध्ये नेहमीच गर्दी असते. लोक स्वस्त वस्तू घेण्यासाठी डी-मार्टमध्ये जात असतात. अनेक ऑफर आणि सवलती असल्.याने डी-मार्टमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते.

डी-मार्टमध्ये नेहमीच गर्दी असते. लोक स्वस्त वस्तू घेण्यासाठी डी-मार्टमध्ये जात असतात. अनेक ऑफर आणि सवलती असल्.याने डी-मार्टमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते.

2 / 5

याच डी-मार्टमध्ये आता चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात असलेल्या डी-मार्टमधून एका ग्राहकाने 14 हजार 949 रुपयांच्या किराणा सामानाची चोरी केल्याची घटना घडली आहे.

3 / 5

चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव हे आरीफ युसुफ शेख आहे. शनिवारी संध्याकाळी डी-मार्टमध्ये आलेल्या या ग्राहकाने खरेदीच्या नावाखाली काही सामान ट्रॉलीमध्ये भरले होते. बाहेर पडताना त्याने 8 हजार 712 रुपयांच्या सामानाची पावती दाखवली. मात्र, वॉचमनला त्याच्या ट्रॉलीमध्ये अधिक सामान असल्याचे आढळले. या सामनात घरातील उपयोगी वस्तू होत्या. जसं की, डाळी, तांदूळ, गहू वगैरे सामान तो घरी घेउन जात होता.

4 / 5

वॉचमन संतोष जैयस्वाल यांनी ग्राहकाला अडवून विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. ट्रॉलीची तपासणी केली आणि त्यात काही सामान पैसे न देता चोरून नेले जात असल्याचे समजले. या सामानाची एकूण किंमत 14 हजार 949 रुपये होती.

5 / 5

डी-मार्टचे साहाय्यक व्यवस्थापक मिर्झा बेग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आता महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरीफ युसुफ शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us