तुम्हाला पण बन मस्का आवडतो? जरा जपून.., पुण्यातील प्रसिद्ध कॅफेमध्ये धक्कादायक घटना

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे पुणेकर खवय्यांना चांगलाच धक्का बसला आहे. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

तुम्हाला पण बन मस्का आवडतो? जरा जपून.., पुण्यातील प्रसिद्ध कॅफेमध्ये धक्कादायक घटना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2025 | 9:12 PM

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बन मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ज्या ग्राहकानं कॅफेमध्ये बन मस्काची ऑडर दिली होती, त्याने या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणाची गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे, सीसीटीव्हीची तपासणी सुरू असून, घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यात येत असल्याचं कॅफेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील  गुडलक कॅफे पुणेकर खवय्यांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अगदी लहाणांपासून  ते ज्येष्ठांपर्यंत पुण्यातील या प्रसिद्ध कॅफेमध्ये इराणी चहा आणि बन मस्का खाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागलेली असते.

मात्र याच गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये चक्क काचेचा तुकडा आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ज्या ग्राहकासोबत हा प्रकार घडला आहे,  त्याने देखील या व्हिडीओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. या ग्राहकाकडून काचेचा तुकडा असल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र अजूनही तो काचेचा तुकडा होता की, दुसरं काही याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही.

या कॅफेमध्ये आलेल्या एका ग्राहकानं चहा आणि बन मस्का मागवला होता. या पदार्थाचा आस्वाद घेत असताना त्यांना चक्क या बन मध्ये काचेचा तुकडा आढळून आला, त्यानंतर घडलेल्या या प्रकारची गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून  गंभीर दखल घेण्यात आली आहे. हा प्रकार नेमका  कसा घडला? याबद्दल सीसीटीव्हीची पडताळणी सुरू असल्याची माहिती कॅफेच्या व्यवस्थापनाकडून माध्यमांना देण्यात आली आहे.

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान या घटनेचा एक व्हिडीओ देखील आता चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्या ग्राहकासोबत हा प्रकार घडला आहे,  त्याने देखील या व्हिडीओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.