AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरसेवक रमेश म्हात्रेंचं टेन्शन वाढलं; डोंबिवलीत 14 डॉक्टरांनी घेतला आक्रमक पवित्रा

dombivli doctor assault : डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी एजन्सीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शास्त्रीनगरमधील 14 डॉक्टरांनी सेवा थांबवली आहे.

नगरसेवक रमेश म्हात्रेंचं टेन्शन वाढलं; डोंबिवलीत 14 डॉक्टरांनी घेतला आक्रमक पवित्रा
| Updated on: Jul 10, 2026 | 2:59 PM
Share

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि वैभव सोळुंके यांच्यावर झालेल्या मारहाणीनंतर EMKAY एजन्सी आक्रमक झाली आहे. याच EMKAY एजन्सीमार्फत शास्त्रीनगरमध्ये मारहाणग्रस्त सृष्टी बाविस्कर आणि वैभव साळुंके सेवा बजावत होते. या घटनेनंतर एजन्सीने कल्याणच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील 12 ते 14 डॉक्टरांनी काम थांबवलं आहे. पुरेशी सुरक्षा मिळाल्याशिवाय डॉक्टर कामावर रुजू होणार नाहीत, अशी ठाम भूमिका एजन्सीने घेतली आहे.

एजन्सीचे RMO जॉन फर्नांडिस यांनी आज शुक्रवारी KDMCच्या मुख्य अधिकारी दीपा शुक्ला यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. रुग्णालय परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मारहाणग्रस्त डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि वैभव सोळंके यांच्याशी एजन्सीचा सतत संपर्क सुरू आहे. ते सध्या केवळ संदेशांद्वारे भूमिका मांडत आहेत. दोन्ही डॉक्टरांनी अद्याप अधिकृतपणे राजीनामा दिलेला नाही. त्याबाबत कोणतीही अंतिम भूमिका जाहीर केलेली नाही. तर याबाबत मुख्य अधिकारी दीपा शुक्ला यांनी हा विषय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला असून आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. ‘अद्याप कोणाचाही राजीनामा आलेला नाही. अधिकृत माहिती एजन्सीकडूनच मिळेल. डॉक्टर लवकरच सेवेत परततील अशी अपेक्षा आहे, असे दीपा शुक्ला यांनी स्पष्ट केले.

जॉन फर्नांडिस यांनी नेमकं काय म्हटलं?

एजन्सीचे RMO जॉन फर्नांडिस यांनी म्हटलं की, ‘आम्ही 24 तास सेवा बजावत असतो. आमचे महिला आणि पुरूष असे दोन्ही डॉक्टर सेवा बजावत असतात. त्यांना 24 तास सुरक्षा मिळाली पाहिजे. आमचे डॉक्टर अद्याप ऑन ड्युटी आहे. मारहाणग्रस्त डॉक्टरांचा राजीनामा आलेला नाही. ते घाबरल्याने त्यांनी नंतर राजीनामा देणार असल्याचे सांगितले किंवा पुन्हा सेवेत रुजू होऊ. त्यांच्याकडून अधिकृत माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे सांगू शकत नाही. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना मानसिक त्रास झाला आहे. घटनेमुळे हॉस्पिटलला येण्यासाठी घाबरत आहेत. वारंवार घटना घडू लागल्याने डॉक्टर घाबरत आहेत. या घटनेमुळे डॉक्टरांना सुरक्षा मिळावी. शास्त्रीनगरमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. डॉक्टरांनी 24 तास सुरक्षा मिळायला पाहिजे’.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे