चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊ नका; मनसेची भूमिका

| Updated on: Dec 22, 2020 | 6:12 PM

बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून चिपी विमानतळाला त्यांचे नाव दिले जाऊ नये, असे मला वाटते. | MNS on Chipi Airport

चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊ नका; मनसेची भूमिका
Follow us on

सिंधुदुर्ग: बंद पडणाऱ्या चिपी विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thacekray) यांचे नाव देऊ नका, अशी भूमिका आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) घेतली आहे. चिपी विमानतळाला (Chipi Airport) बाळासाहेबाचं नाव देऊन बाळासाहेबांचा सन्मान कमी करू नका, अशी मागणी मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. (Politics over Sindhudurg Chipi airport)

त्यांनी मंगळवारी सिंधुदुर्गात पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात भूमिका मांडली. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून चिपी विमानतळाला त्यांचे नाव दिले जाऊ नये, असे मला वाटते. हे विमानतळ नेमकं कधी सुरू होणार, आणि सुरु झाल्यास किती दिवस चालेल याबाबत शंका आहे. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं किती योग्य आहे, असा सवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला. त्यापेक्षा कोकणावर प्रेम करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई-गोवा महामार्गाला द्या, अशी मागणी उपरकर यांनी केली.

चिपी विमानतळाच्या नामकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद

गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला चिपी विमानतळाची प्रतिक्षा आहे. मात्र, तब्बल 20 वर्षांपासून या विमानतळाचे काम रखडले आहे. आता हे विमानतळ पुर्णत्वाच्या मार्गावर असताना त्याला कोणाचे नाव द्यायचे, हा वाद सुरु झाला आहे.

राणे कुटुंबीयांवर उपरकरांचे टीकास्त्र

राणे व त्यांच्या पुत्रांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीवर  टीका केली. शिवसेना संपविण्याची भाषा केली. त्यावेळी जिल्ह्यात आम्ही राणेंशी लढलो. आम्ही त्यावेळी राणेंशी संघर्ष केला नसता तर आताची शिवसेना राहिली नसती. आता पुतणा मावशीच्या प्रेमाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह राणे करत आहेत.

राणेंच्या पुञांनी बाळासाहेबांवर केलेल्या काही वक्तव्यामुळे नारायण राणेंना माफीसुद्धा मागावी लागली होती. त्यामुळे राणे कुटुंबातील लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर बोलायचा अधिकार नसल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली.

संबंधित बातम्या:

निवडणुकीच्या तोंडावर चिपी विमानतळ उद्घाटनाचा घाट

चिपी विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग : विनायक राऊत

चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव की बॅरिस्टर नाथ पै यांचं? मुख्यमंत्री म्हणतात…

(Politics over Sindhudurg Chipi airport)