निवडणुकीच्या तोंडावर चिपी विमानतळ उद्घाटनाचा घाट

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ टर्मिनलच्या इमारतीचं आज उद्घाटन  होणार आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी या इमारतीचं उद्घाटन उरकण्यात येत आहे. विमानतळावरील अंतर्गत सेवा पूर्ण झाल्या नसताना इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. या विमानतळामुळे पर्यटन जिल्हा असणारा सिंधुदुर्ग देशातील प्रमुख […]

निवडणुकीच्या तोंडावर चिपी विमानतळ उद्घाटनाचा घाट
Chipi Airport
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ टर्मिनलच्या इमारतीचं आज उद्घाटन  होणार आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी या इमारतीचं उद्घाटन उरकण्यात येत आहे. विमानतळावरील अंतर्गत सेवा पूर्ण झाल्या नसताना इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय.

या विमानतळामुळे पर्यटन जिल्हा असणारा सिंधुदुर्ग देशातील प्रमुख शहरांशी जोडला जाणार आहे. साडेतीन किमीची धावपट्टी असलेल्या या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरवण्याची सुविधा आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या भविष्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.

12 सप्टेंबर 2018 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणे वादात, केसरकर यांनी या विमानतळावर खासगी विमान उतरवून, विमानतळाची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले होते. त्यावेळी नारायण राणेंनी केसरकर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे या विमानतळावरून प्रत्यक्षात अद्याप विमान सेवा सुरू झाली नसली, तरी राजकीय आरोप प्रत्यरोपांची अनेक उड्डाणे झाली आहेत.

आजच्या या कार्यक्रमाला शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत. तर स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे देखील उपस्थित असतील. मुख्यमंत्री चिपी विमानतळ टर्मिनस इमारती सोबतच इतर विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. यात देवगड येथील महत्वाच्या आनंदवन बंदर प्रकल्पाचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.