माध्यमांशी बोलत असताना फडणवीसांच्या जवळच ड्रोन पडला, देहूमध्ये नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असतानाच मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रोन पडण्याची घटना घडली आहे. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला.

माध्यमांशी बोलत असताना फडणवीसांच्या जवळच ड्रोन पडला, देहूमध्ये नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2025 | 5:35 PM

संत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे.याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असतानाच मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रोन पडण्याची घटना घडली आहे. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाहीये. ड्रोन खाली पडल्यानंतर पोलिसांकडून तो जप्त करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

आजपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. याचदरम्यान ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. याचदरम्यान हा ड्रोन मुख्य प्रवेशद्वाराजवळ पडला. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाहीये, पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला आहे.

ड्रोनद्वारे चित्रिकरण

आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे, या पालखी चित्रिकरण ड्रोनच्या माध्यमातून केलं जातं. पालखीचं चित्रिकरण सुरू असतानाच हा ड्रोन खाली कोसळल्याची घटना घडली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ अवघ्या पाच ते दहा फूट अंतरावर हा ड्रोन खाली कोसळला. त्यानंतर पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला आहे.

दरम्यान दुसरीकडे अलंकापुरीमध्ये देखील वारकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा आणि वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत, विठूरायाच्या दर्शनाची आस या वारकऱ्यांना लागली आहे. देहू आणि आळंदीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठलाच्या नामाचा जयघोष सुरू आहे. वारकीर मोठ्या उत्साहान वारीमध्ये सहभागी झाले आहेत.