सातारा:माण तालुक्यात दुष्काळी आढावा बैठकीत ४८ तासांत पाणी आणि चाऱ्याचे गावनिहाय सर्वेक्षण करण्याचे मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश

अर्ज केल्यापासून ४८ तासांच्या आत संबंधित गावामध्ये पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे नियोजन केल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले आहे.

सातारा:माण तालुक्यात दुष्काळी आढावा बैठकीत ४८ तासांत पाणी आणि चाऱ्याचे गावनिहाय सर्वेक्षण करण्याचे मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश
Jaykumar Gore
| Updated on: Nov 23, 2026 | 10:23 PM

सातारा: माण-खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार धैर्यशील कदम जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह स्थानिक प्रशासन उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गोरे यांनी, अर्ज केल्यापासून ४८ तासांच्या आत संबंधित गावामध्ये पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. तसेच पशुधन आणि धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी चाऱ्याचे तातडीने गावनिहाय सर्वेक्षण करून चारा टंचाईग्रस्त गावांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठे सुरक्षित ठेवण्यासोबतच जिहे-कठापूरचे पाणी सुरू असून उरमोडीचे दुसरे आवर्तन १ जानेवारीला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, नवीन बंधारे उभारणे, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आणि ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...

 जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी उपसा सिंचन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली

जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. सुमारे ३ हजार ५३३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून तीन तालुक्यांतील ३१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यावेळी मंत्री महाजन यांनी सुरू असलेल्या कामांचा आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us