सर्वात मोठी बातमी, राज्यात दुष्काळ जाहीर होणार, तारीख आली समोर…

राज्यात सोयाबिनची पिके करपली आहेत. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक करत होते. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

सर्वात मोठी बातमी, राज्यात दुष्काळ जाहीर होणार, तारीख आली समोर...
drought in maharashtra 2026
| Updated on: Sep 23, 2026 | 10:45 PM

राज्यात एल – निनोचा फटका जाणवू लागला आहे. आता मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यातच टँकर सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबिनची पिके करपली आहेत. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक करत होते. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

राज्यात अवर्षणाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने मदत जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.मात्र,राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जेष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची मागणी रास्त असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील लातूर, धाराशीव जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यांनी पावसाअभावी करपलेल्या पिकांची पाहणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकट मदत देण्याचे आश्वासन दिले. कोणत्याही प्रकारचे आढेवेढे घेतले जाणार नाही, शेतकऱ्यांना सरकट मदत दिली जाईल, असा शब्दच मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

अधिवेशन बोलवणार का ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या संदर्भात लवकरच निर्णय घेणार आहेत. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करुन आता येत्या शनिवारपर्यंत दुष्काळ जाहीर होईल असे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना मदत करताना त्यांना काही अडचणी असेल तरी देखील त्यावर चर्चा करणार असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे. राज्यात दुष्काळ परिस्थितीवर कर्नाटक राज्याप्रमाणे अधिवेशन बोलवणार का ? या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की अधिवेशन घेण्यापेक्षा फिल्डवर जाऊन लोकांना मदत केली पाहिजे असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us