ST accident: खराब रस्त्यामुळे एसटी झाली पलटी, अक्कलकोट तालुक्यातील धक्कादायक घटना, बसमध्ये होते 50 प्रवासी

| Updated on: May 20, 2022 | 2:44 PM

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र काही जण या अपघातात जखमी झाले आहेत, तर काही जणांना मुका मार बसला आहे. या सगळ्यांना उपचारासाठी तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. केवळ खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याने, प्रवाशांनाही सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कळलं नाही.

ST accident: खराब रस्त्यामुळे एसटी झाली पलटी, अक्कलकोट तालुक्यातील धक्कादायक घटना, बसमध्ये होते 50 प्रवासी
Solapur ST accident
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

सोलापूर – खराब रस्त्यामुळे (bad road)एसटीच्या ड्रायव्हरचं (ST bus driver)नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची धक्कादायक घटना (shocking accident)समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटहून कल्लाप्पावाडीकडे बस जात असताना हा अपघात घडला. खराब रस्ता होता, त्यामुळे एसटी ड्रायव्हरला वेग नियंत्रित करणं अवघड झालं, अशा स्थितीत त्याचा एसटीवरील ताबा सुटला, आणि बस थेट पलटली. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र काही जण या अपघातात जखमी झाले आहेत, तर काही जणांना मुका मार बसला आहे. या सगळ्यांना उपचारासाठी तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. केवळ खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याने, प्रवाशांनाही सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कळलं नाही. प्रवाशी चांगलेच भेदरलेल्या अवस्थेत होते.

कसा झाला अपघात ?

अक्कलकोटवरुन एसी बस सकाळच्या वेळी कल्लाप्पावाडीकडे चालली होती. कल्लाप्पावाडीजवळील रस्ता खराब आहे. या ठिकाणी वेगात आलेल्या एसटीच्या ड्रायव्हरला गाडीवर नियंत्रण करता आले नाही. खराब रस्ता होता. त्यामुळे वेग नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात त्याने जोरात ब्रेक मारला. मात्र ब्रेक इतक्या जोरात झालगा की, बस शेजारी असलेल्या शेतामध्ये पलटी झाली. या बसमध्ये ५० प्रवासी प्रवास करत होते. काही कळायच्या आतच बस पलटल्याने त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी आणि शेतात काम करणारे, रस्त्यावरुन प्रवास करणारे मदतीसाठी सरसावले. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही, मात्र काही जण जखमी झाले आहेत. तर काही जणांना मुका मार बसला आहे. त्यानंतर तातडीने त्या ठिकाणी एम्ब्युलन्स बोलावण्यात आली जखमींना तातडीने गावातच असेलल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक

खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण राज्यात कमी नाही. नेहमीच खराब रस्त्यांमुळे मोठमोठे अपघात होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. राज्यात ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी रस्ते चांगल्या स्थितीत नाहीत. त्याचा फटका वाहनचालकांना नेहमीच बसतो. अनेकांची आयुष्य यात नासली जातात. एसटीसारख्य मोठ्या वाहनाचा अपघात सोलापुरात होत असताना, स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थ आणि प्रवाशांनी सांगितले आहे. राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेकेडे गांभिर्याने पाहण्याची गरज व्यक्त होते आहे.