बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे सार्वजिनक बांधकाम विभागाचे 111.65 कोटी रुपये लाटण्याचा प्लॅन फसला, पालघरमध्ये खळबळ

पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे तब्बल 111. 65 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता सार्वजनिक बांधकाम विभागानं अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे सार्वजिनक बांधकाम विभागाचे 111.65 कोटी रुपये लाटण्याचा प्लॅन फसला, पालघरमध्ये खळबळ
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 27, 2025 | 11:57 PM

पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे तब्बल 111. 65 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामं केली जातात. हे काम ज्या ठेकेदाराला दिलं जातं, तेव्हा त्या ठेकेदाराकडून अनामत रक्कम जमा करून घेतली जाते, ही अनामत रक्कम कामाच्या स्वरुपावर अवलंबून असते, म्हणजे ही रक्कम कामाच्या एकूण बजेटच्या दोन ते तीन टक्क्यांपर्यंत असते, काही कामांमध्ये ती पाच टक्के एवढी देखील असू शकते.

ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जव्हार शाखेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे खातं आहे, त्यामध्ये जमा करण्यात येते. मात्र काम झाल्यानंतर अनेक कारणांमुळे ठेकेदार ही रक्कम पुन्हा परत घेत नाहीत, त्यामुळे ही रक्कम या खात्यामध्ये तशीच राहाते, या बदल्यात मोठ्या प्रमाणात व्याज देखील मिळतं, दरम्यान ठेकेदारांची अनामत रक्कम जमा असलेल्या खात्यामधून तब्बल 111. 65 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने चेक व आवश्यक स्लिप स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जमा केली. मात्र रक्कम मोठी असल्यानं बँक कर्मचाऱ्याला संशय आला आणि या खात्यामधून 111. 65 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न फसला आहे. दरम्यान प्रकरण समोर येताच आता या प्रकरणात बांधकाम विभागानं अंतर्गत चौकशी सुरू केली असून, यामध्ये विभागातीलच काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ठेकेदारांची अनामत रक्कम असलेल्या खात्यामधून तब्बल 111. 65 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने चेक व आवश्यक स्लिप स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जमा केली. मात्र रक्कम मोठी असल्यानं संबंधित बँक अधिकाऱ्याला संशय आला आणि खात्री करण्यासाठी तसेच सहीची पडताळनी करण्यासाठी तो थेट बांधकाम विभागाच्या कार्यालयात पोहोचला, दरम्यान तिथे गेल्यानंतर आपण असा कोणताही चेक दिला नसल्याचं संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितल्यामुळे हे प्रकरण समोर आलं आहे. दरम्यान आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

‘राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जणू भस्म्या झाला की काय अशी चक्रावून टाकणारी प्रकरणं बाहेर येतायत. राज्यात कंत्राटदांचे तब्बल 90 हजार कोटींची बिल थकीत असल्याने कंत्राटदार आत्महत्या करतायत, नवीन कामं करण्यास कुणी धजावत नाही. पण जव्हार (जि. पालघर) तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांच्या बँकेत जमा असलेल्या अनामत रकमेपैकी तब्बल १११ कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न खुद्द सार्वजनिक बांधकाम खात्यातीलच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच केला. बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा मोठा दरोडा वाचला, हे नशीब म्हणावं लागेल. पण यावरुन सरकारचा प्रशासनावर काही वचक, धाक, भीती आहे की नाही असा प्रश्न पडतो. प्रशासनातील अधिकारी राजरोसपणे असे ‘बिग शॉट’ मारत असतील तर देवाभाऊ अधिकाऱ्यांना तुमची भिती उरली नाही का? या सरकारी कार्यालयात बसलेल्या या दरोडेखोरांवर दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा सरकारचीच याला मूक संमती आहे, असं आम्ही म्हणू! असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.’

 

दरम्यान आता या प्रकरणावरून रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.