नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प काय आहे? महाराष्ट्रासाठी किती फायद्याचा, एकनाथ खडसे यांची विशेष मुलाखत

महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. राज्यात सध्या नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्प प्रचंड चर्चेत आहे. या योजनेसाठी तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या जलसिंचन प्रकल्पासाठी एकनाथ खडसे यांनी फार मोठं काम केलं आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या मुलाखतीत याबाबत सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे काही प्रकल्प रखडले त्याला राजकीय उदासीनता असल्याचं मत खडसेंनीदेखील परखडपणे मांडलं.

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प काय आहे? महाराष्ट्रासाठी किती फायद्याचा, एकनाथ खडसे यांची विशेष मुलाखत
एकनाथ खडसे यांची स्फोटक मुलाखत
| Updated on: Sep 12, 2024 | 7:55 PM

राज्यात सध्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाची चांगलीच चर्चा आहे. नारपारच्या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रासाठी उपयोग व्हावा, अशी संकल्पना अनेक दशकांपासून आहे. महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री भाऊसाहेब हिरे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यानुसार त्यांनी सर्वेक्षणही करुन घेतला. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली. नारपारच्या पाण्यावर आता राज्यातील वेगवेगळ्या भागातील नेत्यांचा दावा केला जातोय. महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माजी पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. त्यांच्या कामाची व्याप्ती सांगणारी एक मुलाखत आम्ही घेतली. नारपार प्रकल्प आणि राज्यातील पाणी प्रश्नासाठी काम करणारे एकनाथ खडसे यांची पोटतिडकी यातून स्पष्ट होताना दिसली. “अथांग असं पाणी आहे, पण ते असंच समुद्रात जावून मिळत आहे. प्रत्येक थेंबासाठी माझा जीव जळतो”, असं एकनाथ खडसे मुलाखतीत म्हणाले. 1) नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी आपण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे भूमीपूजन करण्यासाठी गेले होते हे...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा