खडसेंची लवकरच भाजपमध्ये घरवापसी, टीव्ही ९ मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब

खान्देशातील दिग्गज नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. ज्याचा फोटो टीव्ही ९ मराठीच्या हाती लागला आहे.

खडसेंची लवकरच भाजपमध्ये घरवापसी, टीव्ही ९ मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब
eknath khadse
| Updated on: Apr 06, 2024 | 5:47 PM

Eknath Khadse : महाराष्ट्रातले दिग्गज नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे नुकतेच दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या हायकमांडशी भेट घेटल्याची बातमी टीव्ही ९ मराठीने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. एकनाथ खडसे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. त्यामुळं लवकरच खडसेंची भाजपात घरवापसी होणार अशी शक्यता आहे. भाजपात जायचं असेल तर सर्वांना विश्वासात घेवूनच जाणार असे संकेत देखील एकनाथ खडसे यांनी यानंतर दिले होते.

नाथाभाऊंनी घेतली शाहांची भेट

एकनाथ खडसे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. एकनाथ खडसे यांनी सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. इतकंच नाही तर त्यांना भाजपने पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी तब्येतीच्या कारणास्तव पवारांच्या राष्ट्रवादीकडून सूनेविरोधात निवडणूक लढण्यास नकारही दिला आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते जर परत येणार असेल तर पक्षही त्यांचं स्वागत करेल असं रक्षा खडसे म्हणाल्या होत्या.

एकनाथ खडसे यांनी कोर्टाच्या कामासाठी दिल्लीला गेल्याचं म्हटलं होतं. पण त्यांचा आता एक फोटो समोर आल्याने त्यांनी अमित शाहांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.