दादा तुम्ही धरणात पाणी नाही म्हणून काय बोलले होते? उद्धव ठाकरेंचे नाव न घेत आत्मक्लेश करणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सवाल

आमचे तुम्ही पन्नास वर्षापूर्वीचे काढायला लागला आहेत पण आम्ही तुमचं मागचं काही काढत नाही, उलट माणूस आत्मक्लेश करतो तेव्हा सुधारतो, ती चुक परत पुन्हा करत नाही असं मुख्यमंत्री शिंदे सभागृहात म्हणाले आहे.

दादा तुम्ही धरणात पाणी नाही म्हणून काय बोलले होते? उद्धव ठाकरेंचे नाव न घेत आत्मक्लेश करणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सवाल
Image Credit source: Google
| Updated on: Dec 30, 2022 | 5:03 PM

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जोरदार टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेत केली आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांच्या एका वादग्रस्त विधानाचा संदर्भ दिल्याने शिंदे यांच्या टीकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सिंचन प्रकल्पावरून बोलत असतांना मागच्या अडीच वर्षात फक्त एका सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली होती त्यात आम्ही सहा महिन्यात 18 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. गडचिरोली येथे आम्ही खनिजावर ऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प सुरू करत आहोत, सूचना नक्की करा आम्ही त्याचा विचार करू असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. याचवेळी बोलत असतांना 18 हजार कोटीचे प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. अडीच लाख हेक्टर शेती ओलिताखाली येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी घेऊन त्यांना मोबदला मिळाला तर पाहिजे म्हणून हा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले पण याच वेळी त्यांनी अजित पवार यांचा संदर्भ दिल आहे.

दादा म्हणाले आता मी चुक करत नाही, पण जेव्हा शेतकऱ्यांनी पाणी मागितले त्यावेळी तुम्हाला आत्मक्लेश करावा लागला, ते तुम्ही चुकीचे नाही केलं, त्यानंतर तुम्ही चुक् केली नाही.

आमचे तुम्ही पन्नास वर्षापूर्वीचे काढायला लागला आहेत पण आम्ही तुमचं मागचं काही काढत नाही, उलट माणूस आत्मक्लेश करतो तेव्हा सुधारतो, ती चुक परत पुन्हा करत नाही.

चुक मान्य करतो तो माणसाचा मोठे पणा असतो त्यानंतर तो चुक करत नाही, पण काही लोक चुकतात तरी ते मान्य करत नाही.

एक चुकेल, दहा चुकेल पन्नास कसे काय चुकू शकतात? पण मी कसा काय चुकीचा असे काही लोक म्हणतात, त्यामुळे तुम्ही वाटून घेऊ नका तुम्ही आता चुकत नाही असे म्हणत शिंदे तूफान टोलेबाजी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानाच्या संदर्भ देत थेट उद्धव ठाकरे कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.