Maharashtra Election News LIVE : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, ठाकरे बंधूंच्या युतीची आज होणार घोषणा
BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीची आज दुपारी घोषणा होणार आहे. आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हे दोन्ही बंधू आगामी महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा करणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
मुबंई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवणार – संजय राऊत
दिल्लीतील बूड पुसता येत नाही, चाटता येतात… बूट चाटण्याची सध्या रंगीत तालीम सुरु… जिथे शक्य आहे तिथे युती करणार… शिवसेनेमे कोणाला विनाकारण मारलं याचं उदाहरण दाखवा… उत्तरप्रदेशात मराठी लोकांवर हल्ले.. बेळगालात 212 मराठी माणसांवर हल्ले…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…
-
कल्याण डोंबिवलीमध्ये युतीची बोलणी सुरू असतानाच भाजपमध्ये आक्रमक सूर
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोरच माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची शिवसेनेवर घणाघात ‘शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते!’.. त्याच्यावर विश्वास ठेवणे अवघड …कल्याण–डोंबिवलीतील १२२ जागांवर भाजपचे उमेदवार उभे करा’ कार्यकर्त्यांची ताकद प्रचंड; जनतेच्या जोरावर भाजपचाच विजय होणार …भाजप माजी मंत्री जगन्नाथ पाटील
-
-
ठाण्यात वाढली भाजपाची ताकद, थेट काही महत्वाचे पक्षप्रवेश
गुन्हेगारीचा ठपका असणाऱ्या मयुर शिंदे यांच्या ठाण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांचा सह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा भाजप पक्षात घरवापसी करत झाला पक्ष प्रवेश. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात जयत तयारी जाहीर पक्षप्रवेशाची करण्यात आली होती. मात्र आचारसंहिता कारण दिल्यामुळे हा पक्षप्रवेश रद्द करण्यात आला होता.
-
अमरावती महानगरपालिकेत शिंदेंची शिवसेना 18 जागांवर ठाम
तर कालच आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट. राज्यातील महायुतीतील पक्ष असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र अमरावतीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. अमरावती महानगरपालिकेतून 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडून जातात. 2017 मध्ये 45 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते त्यामुळे भाजपची एक हाती सत्ता होती…
-
युतीची होणार थेट घोषणा, बारा वाजता फैसला..
उद्धव ठाकरे राज ठाकरे युती ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ही घटना घडेल मत आणि जागा हा विषय स्वतंत्र आहे. प्रबोधन ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारे, हे दोघे बंधू हातात हात घालून जेव्हा महाराष्ट्रासाठी रनशिंग फुंकतील, त्यावेळेस ज्या थोड्या थोड्या कुत्र्याच्या छत्र्या उगवलेले आहेत.
-
-
महिलेसह तिच्या पतीला अडवून दगडाने मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील उषा फाळके आणि त्यांचे पती हे आपल्या शेतवस्तीच्या परिसरातील शेतातील बांधावरून जात असताना रस्त्यात अडवून बांधावरुन जात असल्याचे कारण काढून अचानक पाच जणांनी दगडाने मारहाण केली तसेच एकाने धारदार वस्तूने चेहऱ्यावर वार केला. यामध्ये उषा फाळके या जखमी झाल्या असुन त्यांच्या शरिरीवार अनेक मारहाणीचे व्रण आहेत. बीड येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
-
ISRO ने रचला मोठा इतिहास…
ISRO ने मोठा इतिहास रचला अजून बाहुबली सॅटेलाईट लॉन्च करण्यात आलंय. संपूर्ण जगाच्या याकडे नजरा होत्या.
-
-
सोलापुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार निवडणूक ?
सोलापुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीच्या हालचाली वाढल्या आहेत. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षाकडून जागावाटपामुळे युतीचे घोडे अडले होते. मात्र आता जागांचे सन्मानपूर्वक वाटप करून महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यासाठी एकमत झाल्याची माहिती समोर आली असून आगामी एक – दोन दिवसात भाजपा आणि शिवसेना दोन्ही वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठकीनंतर घोषणा होण्याची शक्यता आहे.
-
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका दाखल
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला यासंदर्भात नोटीस आली आहे. 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर मनपा युती आणि जागा वाटप संदर्भात आज भाजप- शिवसेना शिंदे गटात होणार चर्चा
छत्रपती संभाजीनगरमधील मनपा युती आणि जागा वाटप संदर्भात आज शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांची मुंबई मध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. काल शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचे काही लोक मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप केला होता. आज दोन्ही मंत्री सावे आणि शिरसाट युती संदर्भात चर्चा करून वरिष्ठांना अहवाल देण्याची शक्यता आहे.
-
पुणे – मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर नजर, 31 डिसेंबरनिमित्त आरटीओची मोहीम
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे . आरटीओकडून 31 डिसेंबर पर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. यासाठी आठ सुरक्षा पत्रके तयार केले असून त्यांच्यामार्फत ब्रेथ ॲनलायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे.
-
युतीच्या घोषणेपूर्वी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर करणार अभिवादन
उद्धव व राज ठाकरे यांच्या युतीची आज घोषणा होणार असून तत्पूर्वी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पण आज जागावाटप जाहीर होणार नसून फक्त युतीची घोषणा होईल अशी माहित समोर आली आहे.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बहुचर्चित युतीचा मुहूर्त ठरला आहे. आज दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जागावाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या युतीच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पुण्यात यंदा हुडहुडी वाढली असून डिसेंबर महिन्याने थंडीचे गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत डिसेंबरच्या अवघ्या 23 दिवसात तब्बल तेरा दिवस किमान तापमानाची नोंद एक अंकी झाली आहे. जळगावच्या पारोळा येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. कापूस खरेदीस नकार दिल्यानंतर शेतकऱ्याने शासकीय खरेदी केंद्रावरील ग्रेडरवर प्रश्नांचा भडिमार करत संताप व्यक्त करत गोंधळ घातला. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Published On - Dec 24,2025 7:57 AM
