AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर संपला, येत्या दोन दिवसात होणार मोठी घोषणा

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि एमएमआर क्षेत्रातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये ५ तास मॅरेथॉन चर्चा पार पडली.

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर संपला, येत्या दोन दिवसात होणार मोठी घोषणा
BJP Mahayuti
| Updated on: Dec 24, 2025 | 9:10 AM
Share

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) महापालिकांसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात तब्बल ५ तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली. रात्री उशिरा सुरू झालेली ही चर्चा पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत जागांच्या संख्येवरून आणि विशिष्ट प्रभागांमधील ताकदीवरून सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यांचा आदर राखत निवडून येण्याची क्षमता हा मुख्य निकष ठेवला आहे.

विविध विषयांवर हास्यविनोद

प्रमुख नेत्यांची उपस्थिती या बैठकीला केवळ वरिष्ठ नेतेच नव्हे, तर समन्वयासाठी महत्त्वाचे असलेले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि सरचिटणीस राहुल शेवाळे हे देखील उपस्थित होते. मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बैठकीत अत्यंत खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. केवळ आकडेमोड न करता, नेत्यांमध्ये विविध विषयांवर हास्यविनोदही झाले.

बैठकीत दीर्घकाळ चर्चा

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांवर या बैठकीत दीर्घकाळ चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी मोदींसोबतचे आपले वैयक्तिक अनुभव आणि त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा याबद्दल आवर्जून एक गोष्ट सांगितली. या बैठकीत मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी १५० जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित ७७ जागांचा तिढाही सुटला आहे.

महायुतीचा जागा वाटपाचा मुख्य फॉर्म्युला ठरला असला तरी येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभागस्तरावरील उमेदवारांच्या नावांवर चर्चा होईल. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महायुतीच्या वतीने जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच एका पत्रकार परिषदेद्वारे केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.