Sushma Andhare : शुभस्य शिघ्रम … 4 मुलं जन्माला घाला म्हणणाऱ्या नवनीत राणा यांना सुषमा अंधारेंचा खोचक टोला, काय म्हणाल्या ?
नवनीत राणांनी ‘4 बायका 19 मुलं’ विधानाचा दाखला देत हिंदूंना 3-4 मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. यावरून नवा वाद पेटला असून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी राणांना खोचक टोला लगावला. राणा यांचे हे विधान खूपच वादग्रस्त ठरले आहे.

त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे. ते जर खुलेपणे सांगत असतील की 4 बायका आणि 19 मुलं आहेत तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन चार मुलं जन्माला घातली पाहिजेत असं वक्तव्य भाजप नेत्या नवनीत राणांनी (Navneet Rana) केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एक मौलानाने विधान केलं होती की त्याला 19 मुलं आहेत, त्याचाच दाखल देत नवनीत राणांनी देशातील हिंदूना 1 मुलावर संतुष्ट न राहता, तीन ते चार मुलं जन्माला घाला असा सल्ला नुकताच दिला होता. मात्र् त्यांच्या या विधानाने गदारोळ निर्माण झाला असून नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
नवनीत राणा यांच्या या विधानावर विविध प्रतिक्रिया येत असून त्यातच ठाकरे गटाच्या नेत्या, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही रिॲक्शन दिली आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवरील त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट करत नवनीत राणांना खोचक टोला लगावला आहे, तसेच त्यांना एक सल्लाही दिला आहे. 4 मुलं जन्माला घाला असं सांगणाऱ्या नवनीत राणां यांना सुषमा अंधारे यांनी शुभस्य शिघ्रम असं म्हणत नवनीत राणा यांनी स्वतःपासून याची सुरुवात करायला हवी असाही सल्ला दिला. त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा ?
‘एक मौलाना आहेत, ते खुलेआम असं म्हणतात की मला 4 बायका आणि 19 मुलं आहेत.मला 30-35 मुलं हवी होती, पण तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची मला लाज वाटते’, असं ते म्हणाल्याचं नवनीत राणांनी सांगितलं.’ मी सगळ्या हिंदूंना सांगते, ते जर खुलेआम म्हणतात की 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-4 मुलं जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे. ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? ‘असा सवाल विचारत आपणही तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत याचा पुनरुच्चार नवनीत राणा यांनी केला होता.
मात्र त्यांचं हे वक्तव्य अतिशय वादग्रस्त ठरलं असून त्यामुळे खळबळ माजली, नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली. नवनीत राणा यांच्या या विधानानंतर आता सुषमा अंधारे यांनी फेसबूक अकाऊंटवरून पोस्ट लिहीत त्यांना सल्ला तर दिलाच, पण खोचक टोलाही लगावला.
सुषमा अंधारेंनी यांचा सल्ला काय ?
राणा यांच्या विधानाच दाखल देत सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ अतिशय चांगला विचार आहे… शुभस्य शिघ्रम… याची सुरुवात नवनीत राणा यांनी स्वतःपासून करायला हवी. पण डोहाळजेवणाची जबाबदारी मात्र माझी आणि Adv. Yashomati Thakur ताईंची ची हं’. असं त्यांनी लिहीलं.एवढंच नव्हे तर ‘ आफ्टर ऑल लाडक्या भावजयी चे लाड आम्ही नाही पुरवायचे तर कोणी..? ‘ असा खोचक सवालही अंधारे यांनी राणा यांना उद्देशून उपस्थित केला.
