AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोला विचारल्याशिवाय दारु प्यायलात तर खैर नाही, नवीन कायदा काय सांगतो?

नवीन भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) आता दारू पिऊन पत्नीचा शारीरिक किंवा मानसिक छळ करणाऱ्या पतींना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

| Updated on: Dec 24, 2025 | 9:59 AM
Share
आता घरामध्ये दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या पतींसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. नवीन कायद्यानुसार (BNS) जर पतीने दारू पिऊन आपल्या पत्नीला त्रास दिला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागू शकते.

1 / 8
देशात लागू झालेल्या नवीन भारतीय न्याय संहितेने (BNS) जुन्या ब्रिटिशकालीन आयपीसी (IPC) कायद्यांची जागा घेतली आहे. यामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत अत्यंत संवेदनशील आणि कडक तरतुदी केल्या आहेत.

2 / 8
पूर्वीच्या आयपीसी (IPC) ४९८अ च्या जागी आता बीएनएसमध्ये कलम ८५ आणि ८५ब समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता घरामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पतींना सुधरावं लागणार आहे.

3 / 8
या नवीन कायद्यानुसार, पत्नीला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहचवणे हा गंभीर गुन्हा मानला गेला आहे. जर एखादा पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असेल, शिवीगाळ करत असेल किंवा तिला धमकावत असेल, तर तो या कलमांतर्गत दोषी धरला जाईल.

4 / 8
जर पत्नीने दारू पिण्यास विरोध केला असेल आणि तरीही पती दारू पिऊन घरी येऊन राडा घालत असेल, तर पत्नी पोलिसांत तक्रार करू शकते. या गुन्ह्यासाठी पतीला ३ वर्षांपर्यंत कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

5 / 8
केवळ मारहाणच नाही, तर दारू पिऊन सतत टोमणे मारणे किंवा मानसिक तणाव देणे हा देखील छळाचा भाग मानला जाईल. जर पती दारूच्या नशेत हुंड्याची मागणी करत असेल किंवा दारूमुळे कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांकडे दुर्लक्ष करत असेल, तरीही पत्नीला कायदेशीर दाद मागता येईल.

6 / 8
पती आपल्या पत्नीचा सांभाळ करण्याच्या कायदेशीर जबाबदारीतून सुटू शकत नाही. पीडित महिला संरक्षण, वेगळे राहण्याचा अधिकार आणि पोटगी (Maintenance) देखील मागू शकते, असे कायद्यात नमूद करण्यात आला आहे.

7 / 8
सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ४०% पेक्षा जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दारू हे मुख्य कारण आहे. हीच बाब लक्षात घेऊन नवीन बीएनएस कायद्यात महिलांच्या सुरक्षिततेला आणि कौटुंबिक शांततेला प्राधान्य देण्यात आले आहे.

8 / 8
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा