AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीतील नाराजीबाबत अमित शहांसोबत चर्चा? एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली महत्त्वाची माहिती

Eknath Shinde Amit Shah Meeting: आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे शिवसेना नाराज असल्याच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले. आज सायंकाळी शिंदेंनी अमित शहांचीही भेट घेतली. यात काय चर्चा झाली याची माहिती जाणून घेऊयात.

महायुतीतील नाराजीबाबत अमित शहांसोबत चर्चा? एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली महत्त्वाची माहिती
shinde shah meeting
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Nov 19, 2025 | 10:20 PM
Share

महायुतीत होणाऱ्या अंतर्गत पक्षांतरामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला या मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यानंतर महायुतील नेत्यांनी बैठक घेत पक्षांतरावर तोडगा काढला होता. एकमेकांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही असं ठरलं असल्याची माहितीही नेत्यांनी दिली आहे. मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे शिवसेना नाराज असल्याच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले. आज सायंकाळी शिंदेंनी अमित शहांचीही भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजपच्या नेत्यांची तक्रार केल्याचे बोलले जात होते. मात्र आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

बिहार मधील विजयाचे अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट घेतली – शिंदे

अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘उद्या बिहार सरकारचा शपथविधी आहे, यासाठी मला निमंत्रण मिळालं आहे. या यशाचं अभिनंदन करण्यासाठी मी अमित शहांची भेट घेतली. यात चांगली चर्चा झाली. घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा आनंद आहे. मी आज रात्री बिहारला जात आहे.’

एनडीएतील नाराजीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

एनडीएतील नाराजीवर प्रश्न विचारला असता यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘तक्रीरीचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही, मी लढणारा आहे. तुम्ही ते वेळोवेळी पाहिलं आहे. छोट्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो. आम्ही काल बसून चर्चा केली, एकमेकांनी बसून यावर मार्ग काढला आहे. महायुतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तो स्थानिक पातळीवरील विषय होता तो कालचं संपला आहे. महायुती म्हणून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. विधानसभेला जसं मोठ यश मिळालं तसं आगामी काळातही मिळेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.’

भाजप नेत्यांची तक्रार केल्याच्या आरोपाचे खंडन

अमित शहांसोबत आज झालेल्या भेटीत एकनाथ शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी या आरोपाचं खंडन केलं आहे. आपण फक्त बिहार निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचे अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट घेतल्याचे शहा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?