गावी आलो, दिल्लीत गेलो, लंडनला गेलो तरीही विरोधकांना पोटदुखी, शिंदेंची जोरदार टीका..

एकनाथ शिंदे दरेगावात आहेत. एकनाथ शिंदे दरेगावात गेल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही चर्चा रंगताना दिसली. एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

गावी आलो, दिल्लीत गेलो, लंडनला गेलो तरीही विरोधकांना पोटदुखी, शिंदेंची जोरदार टीका..
Eknath Shinde
| Updated on: Sep 18, 2026 | 6:26 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शिंदे गुजरातमध्ये होते. त्यानंतर थेट दरेगावात गेले. यावेळी विरोधकांच्या टीकेवर बोलताना शिंदे दिसले. निधी वाटपावरून नाराजीच्या चर्चा पूर्णपणे फेटाळल्या, दरवर्षीप्रमाणे यंदाही केवळ गणेशोत्सवासाठी गावी आलो असल्याचे स्पष्ट केले. गावी गेलो, दिल्लीला गेलो किंवा लंडनला गेलो तरी विरोधक टीका करतात. पण प्रत्येक दौरा हा राज्याच्या कामासाठीच असतो, असे सांगितले. लंडन दौऱ्यात महाराष्ट्राची अस्मिता, मराठीचा डंका आणि शासकीय योजनांचे ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला पोटदुखी’असा टोला लगावला.​पावसाची ओढ आणि दुष्काळसदृश परिस्थिती ​मराठवाडा आणि विदर्भात पावसाने मोठा खंड दिल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाल्याची वस्तुस्थिती मान्य केली.

धाराशिवचे पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पुढे शिंदे यांनी म्हटले की, ​नुकसानग्रस्त भागांत 5 तारखेपासून पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही व दौरा अतिवृष्टी असो वा दुष्काळ, शासन बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नसून संपूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास दिला.

​शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई सरकारकडून निश्चित दिली जाईल, अशी खात्री दिली.
​परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दुष्काळी भागाचा दौरा करत असून स्वतःही लवकरच पाहणी दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले. विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर कामातून व शेतकऱ्यांना थेट मदत देऊन दिले जाईल, असे सांगितले.

एकनाथ शिंदे काही दिवसांपासून लंडनला गेले होते. त्यांच्या हा लंडनचा दाैरा तूफान चर्चेत होता. त्यांचे संसदेतील भाषण व्हायरल झाले. लंडनमध्ये जाऊन वडापाव खाताना शिंदे दिसले. संसदेत थेट इंग्रजीमध्ये भाषण करतानाही एकनाथ शिंदे दिसले. एकनाथ शिंदे यांचे लंडनमधील अनेक फोटो व्हायरल होताना दिसले. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर गुजरात जाऊन थेट दरेगावात पोहोचले. यादरम्यान शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगताना दिसले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us