Ramayana Box Office Collection Day 8: आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ सिनेमाचं शॉकिंग कलेक्शन, बॉक्स ऑफिसवर अचानक बदललं कमाईचं गणित
Ramayana Box Office Collection Day 8: अभिनेता रणबीर कपूर आणि आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. अशात सलग आठव्या दिवशी सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं आहे. जाणून घ्या आतापर्यंत सिनेमाने किती कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Ramayana Box Office Collection Day 8: अभिनेता रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. सांगायचं झालं सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शित झाल्यानंतर देखील सिनेमावर अनेकांनी टीका केली. पण होणाऱ्या टीकेचा कोणताच परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झाला नाही. प्रदर्शित झाल्यापासून सलग आठव्या दिवशी सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. दिवाळी असल्यामुळे ठराविक दिवसांत सिनेमाच्या कमईचा आकडा कमी झालेला दिसला. पण आता दुसऱ्या आडवड्याची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच आठवड्यात सिनेमाने 1000 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे.
4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला रामायण दोन भागात तयार झालेला आहे. पहिला भाग 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून दमदार कमाई करताना दिसत आहे. सलग सात दिवस बक्कळ कमाई केल्यानंतर आता आठव्या दिवसाचे देखील कमाईचे आकडे समोर आले आहे. दिग्दर्शत नमित मल्होत्रा दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आठव्या दिवशी देखील बक्कळ कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेडनुसार, ‘रामायण’ सिनेमाने भारतात आठव्या दिवशी तब्बल 53.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दिवस बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला दिवस 64.85 कोटी
दुसरा दिवस 48.05 कोटी
तिसरा दिवस 69.80 कोटी
चौथा दिवस 56.15 कोटी
पाचवा दिवस 107.50 कोटी
सहावा दिवस 94.10 कोटी
सातवा दिवस 70.65 कोटी
आठवा दिवस 53.50 कोटी
‘रामायण’ सिनेमाच्या कमाईचे आकडे पाहता, सिनेमाने आठव्या दिवसाच्या तुलनेत सहाव्या आणि सातव्या दिवशी बक्कळ कमाई केली. आता विकेंड जवळ आल्यामुळे सिनेमाच्या कमाईत किती वाढ होते… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘रामायण’ भारतातील निव्वळ कमाई: 564.60 कोटी रुपये
भारतातील एकूण कमाई (ग्रॉस कलेक्शन): 675.05 कोटी रुपये
‘रामायण’ जागतिक कमाई: 1,033.55 कोटी रुपये
‘रामायण’ सिनेमाची कास्ट
दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमात भगवान राम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर आहे, तर माता सीता यांच्या भूमिकेत साई पल्लवी दिसत आहे. अभिनेता यश याने रावणाच्या भूमिकेला योग्य न्याय दिला असून अभिनेता आदिनाथ कोठारे याने भरत ही भूमिका साकरली आहे, तर रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय यांनी देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे, तर सिनेमाचा दुसरा भाग 2028 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
