AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांचा हाऊस अरेस्टचा दावा, अभिजीत दीपकेंच्या मनात वेगळीच शंका, म्हणाले 2029 आधी हे सरकार..

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दीपके यांनी आपल्या एक्स हँडलवर सोनम वांगचूक यांचा व्हिडिओ रिट्वीट केला आहे.

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांचा हाऊस अरेस्टचा दावा, अभिजीत दीपकेंच्या मनात वेगळीच शंका, म्हणाले 2029 आधी हे सरकार..
Sonam Wangchuk-abhijeet dipke
| Updated on: Nov 13, 2026 | 8:10 AM
Share

सामाजिक कार्यकर्ते आणि वैज्ञानिक सोनम वांगचूक यांनी गुरुवारी रात्री उशिरा एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. “माझ्या घराबाहेर शस्त्रास्त्रांसह अनेक पोलीस तैनात आहेत. मित्रांनो मला नजरकैदेत ठेवलं आहे. इंस्टीट्यूट आणि घराबाहेर 20-25 पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. भरपूर साऱ्या गाड्या आणि तंबू लावण्यात आले आहेत” असा दावा सोनम वांगचूक यांनी केला. “घराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेला प्रत्येक ठिकाणी बंदूक घेऊन शिपाई पहारा देतायत. हे सर्व काल रात्री झालं” असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं.

“तुमच्या लक्षात असेल तर काल सकाळी मी एक स्टेटमेंट दिलं होतं. लडाख काऊंन्सिलच्या थंडीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यावेळी निम्मे लोक इथे नसतील. या काळात निवडणुका लोकांना मान्य नाहीयत. ही काऊन्सिल शक्तीहीन असेल. काल रात्री आम्ही एका धरणे आंदोलनाची तयारी करत होतो. आठ वाजता थोडा आराम करत होतो. त्यावेळी एका पोलीस ऑफिसरसह आठ-दहा लोक तिथे आले. त्यांनी गणवेश परिधान केला नव्हता. त्यांनी तोंडावर मास्क लावलेला. हुडीज परिधान केलेली. ते गुंडसारखे दिसत होते” असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे.

ही मनमानी गुंडाराज झालं हे

“मी त्यांना म्हटलं की मी जेल मध्ये जायला तयार आहे, तर ते मला उचलून आमच्या इंस्टीट्यूट मध्ये घेऊन आले. तिथे माझं घर आहे. तेव्हापासून मी या घरात नजरबंद आहे. प्रत्येक ठिकाणी पहारा आहे. वर्तमानपत्रात असं सांगितलं जातय की, मला घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. पण इतके सर्व पोलीस आहेत, याचा अर्थ मी कुठे जाऊ शकत नाही. नजरकैद आहे. हाच विषय घेऊन आम्ही मॅजिस्ट्रेट, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. एखादा व्यक्ती शातंतेत आंदोलन करणार असेल तर तुम्ही त्याला अटक कशी करु शकता?. ही मनमानी गुंडाराज झालं हे. त्याविरोधात आम्हाला आवाज उठवायचा आहे” असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे.

आपलं आयुष्य धोक्यात टाकलं होतं

सोनम वांगचूक यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दीपके यांनी आपल्या एक्स हँडलवर सोनम वांगचूक यांचा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. “असं वाटतय की, 2029 च्या निवडणुकीआधी हे सरकार सर्वांना नजरकैदत ठेवेल किंवा ताब्यात घेतील, अटक करतील किंवा सोशल मीडिया अकाऊंट्सवर प्रतिबंध घालतील”. “मी सोनम वांगचूक यांच्यासोबत आहे. जंतर-मंतरवर झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान या मनमानी विरुद्ध देशाला जागरुक करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य धोक्यात टाकलं होतं” असं दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'