शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी प्रलंबित असतानाच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नव्या संघटनेचं अन् चिन्हाचं अनावरण झालं आहे. चंद्रहार पाटील यांच्याकडे क्रीडा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू असतानाच या घोषणेमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी प्रलंबित असतानाच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
Eknath Shinde Uddhav Thackeray
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 8:59 PM

देशात सध्याच्या घडीला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक म्हणजे डिलिमिटेशनने जोर धरला आहे. अनेक घडामोडी याविषयाभोवती घडत आहेत. काँग्रेसने या बिलाला कडाडून विरोध केला आहे. पण दुसरीकडे शरद पवारांच्या एनसीपीने मात्र बिलाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तिकडे एम के स्टॅलिन यांच्याही पक्षाने बिलाला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्यण घेतला. राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांची भेट घेतली. आता ते मुंबईत शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमध्ये ते स्टॅलिनप्रमाणे पवारांनाही विनंती करणार आहेत. बिलाला विरोध करावा, त्याच्याविरोधात मतदान करावे, अशी भूमिका इंडिया आघाडीच्यावतीने लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी करणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी हे चेन्नवईवरुन मुंबईकरीता निघाले आहेत.

दरम्यान, दुसरीकडे राज्यात मोठी घडामोड घडली आहे. ही घडामोड उद्धव ठाकरे यांच्यासाठी काहीशी डोकेदुखी ठरणारी आहे. अद्याप शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नव्या क्रीडा संघटनेची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संघटनेच्या चिन्हाचं अनावरण झालं असून एकेकाळी उद्धव ठाकरेंचे नेते असलेले महाराष्ट्र केसी चंद्रहार पाटील यांच्याकडे क्रीडा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Loading...

एकनाथ शिंदे काय म्हणाले

खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. संपूर्ण जिल्ह्यातुन खोखो, रस्सीखेच, लंगडी असे जुने मैदानी खेळ तसेच नवीन खेळ, 78 हजार खेळाडू, हा खूप मोठा आकडा आहे. मुलांमध्ये टॅलेंट असते. त्यांना प्लॅटफॉर्म ची गरज आहे. मोबाईलमुळे मैदानी खेळ विसरलो की काय असं वाटतं. क्रीडा संग्राममध्ये हे टॅलेंट पाहायला मिळालं. मुलांना प्लॅटफॉर्म पाहिजे आणि संधी दिली पाहिजे ते काम श्रीकांत शिंदे यांनी केलं.  सिझन 2 मध्ये इतकी गर्दी तर सिझन 3 मध्ये किती गर्दी होईल. खेळाडू आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून क्रीडा संग्राम यशस्वी झाला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

पुढच्या क्रीडासंग्राममध्ये 1 लाखचा आकडा पार

हा महाराष्ट्र नवा अध्याय घडला. लोकप्रतिनी विकास बरोबर खेळांसाठी सहभाग घ्यावा. आज जी मुले या ठिकाणी खेळली पुढे हे राज्यात ऑलिंपिकमध्ये असतील. खासदार क्रीडासंग्रामच्या माध्यमातून संपूर्ण देशात असे खेळ आयोजित केले पाहिजे. आपल्याला फक्त क्रिकेट माहीत होतं. मात्र इथे 32 खेळ आहेत. देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय, तसं  खेळा मध्येदेखील देशाचे नाव एक नंबरला आलं पाहिजे त्यासाठी पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे.

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडासंग्राम सिझन २ चा भव्य सांगता सोहळा डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह आमदार रवी फाटक, राजेश मोरे आणि बालाजी किणीकर यांची उपस्थिती लाभली आहे. इथे विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव करण्यात आला आहे. ३२ विविध खेळ ३५ हून अधिक क्रीडास्थळे आणि तब्बल ७५ हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमात आलेले अभिनेते बोमन ईरानी यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे कौतुक करत पालकांना मुलाकडून मोबाईल दूर ठेऊन मैदानात मुलांना उतरावे, असे आव्हान केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us