Sonia Gandhi Book Controversy : शिंदे शिवसेनेच्या नेत्या शायना एनसींनी सोनिया गांधींचं ‘जर्नी ऑफ लव’ पुस्तक फाडल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Sonia Gandhi Book Controversy : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. सध्या सोनिया गांधी यांच्या 'जर्नी ऑफ लव' पुस्तकाची सगळीकडे चर्चा आहे.

Sonia Gandhi Book Controversy : शिंदे शिवसेनेच्या नेत्या शायना एनसींनी सोनिया गांधींचं जर्नी ऑफ लव पुस्तक फाडल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Shina NC-Sonia Gandhi
| Updated on: Nov 18, 2026 | 1:04 PM

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. सध्या सोनिया गांधी यांच्या ‘जर्नी ऑफ लव’ पुस्तकाची सगळीकडे चर्चा आहे. या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल शिंदे शिवसेनेने विचारला आहे. यावर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 14 व्या पुण्यतिथी निमित्ताने कांग्रेसच्या एकाही नेत्यांने ट्विट केलं नाही. यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.

“कोण शायना एनसी? सावरकरांबद्दल त्यांना काय माहित आहे, इतिहासतज्ञ् कधीपासून झाल्या. कोणीतरी थोडीफार माहिती असणारा व्यक्ती असला पाहिजे. सावरकरांच्या नातवाने जे मान्य केलं, त्या पलीकडे काय सांगणार.न्यायालयात शिक्कामोर्तब झालं आहे. शिंदे गटाची कुठली विचारधारा माहिती नाही. त्यांची विचारधारा खोक्यापासून सुरु होते, खोक्यावर संपते. पुस्तक फाडून काय होणार? सत्य लपत नसतं. सोनिया गांधींच्या पुस्तकाती विक्रमी विक्री झाली आहे. तुच्या पुस्तक फाडण्याने काय होणार?” असं काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले.

Loading...

(बातमी अपडेट होत आहे)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us