पैशाने भरलेल्या बॉक्सच्या आरोपानंतर शिंदे शिवसेनेचा मनसेच्या जिव्हारी लागणारा वार, मनसेचे सहानगरसेवक सोडून गेले तेव्हाचा व्हिडिओ आहे की..

" या भारतातल्या नागरिकांनी काय खावं काय नाही हा अधिकार मिरा-भाईंदर मनपाला नाही, मुंब्राला काय भूमिका घेणार मग ? शिवसेना म्हणून आमची भूमिका ज्याला जे खायचंय ते खाऊ द्या" असं सचिन अहिर म्हणाले.

पैशाने भरलेल्या बॉक्सच्या आरोपानंतर शिंदे शिवसेनेचा मनसेच्या जिव्हारी लागणारा वार, मनसेचे सहानगरसेवक सोडून गेले तेव्हाचा व्हिडिओ आहे  की..
Eknath Shinde-Raj Thackeray
| Updated on: Nov 24, 2026 | 1:47 PM

“शरद पवार हे निवृत्त होतील असं अजिबात वाटत नाही, ते शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहतील ती विल पॉवर त्यांच्यात आहे. राजकारणात परिवर्तन होऊ शकतं. काहींनी स्ट्रॅटर्जीचा भाग म्हणून वेगळी भूमिका घ्या असं म्हटलय. पण असं काही होणार नाही” असं आमदार सचिन अहिर म्हणाले. “शशिकांत शिंदेंची मुलाखत पाहिली, संघटनेची शिस्त असते, परस्पर काही झालं तर बोलावं लागतं, अधिवेशन होतंय, रोहीत पवारांनी व्यासपीठाचा वापर करावा, मोर्चे काढून काही होणार नाही, अधिवेशनात मुद्दे मांडा” असं सचिन अहिर म्हणाले. “व्यासपीठ सोडून रिलवरच ट्रॅक्टर मोर्चा काढायचाय तर मग त्यांनी अधिवेशनात मुद्दे मांडावे. गोकुळ संस्था कोर्टात जाते तेव्हा ती अधिकृत भूमिका असते, पण संस्थेचा पैसा जाऊ नये हीच आमची भूमिका” असं सचिन अहिर म्हणाले.

“मला व्हिडिओ माहित नाही पण संदिप देशपांडे यांचे सहा नगरसेवक मनसे सोडून गेले हा तेव्हाचा व्हिडीओ की आत्ताचा ? मुंबईच्या प्रश्नावर बोला, रोज सनसनाटी तयार करायची , व्हिडीयो खरा की खोटा ? ते आधी सांगा” असं सचिन अहिर म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना शाखाप्रमुख संतोष पवार यांचा एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलाय. हा व्हिडिओ कुलाब्यातील शाखा क्रमांक 226 चे शाखाप्रमुख संतोष पवार यांचा आहे. एका गाडीमधला हा व्हिडिओ आहे.संतोष पवार मागच्या सीटवर बसलेले आहेत. पालिका निवडणुकीत एका वरिष्ठ नेत्याने हा बॉक्स दिल्याचे संतोष पवार व्हिडिओमध्ये सांगतायत. त्यावर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली.

Loading...

म्हणून ढवळाढवळ नकोय

” या भारतातल्या नागरिकांनी काय खावं काय नाही हा अधिकार मिरा-भाईंदर मनपाला नाही, मुंब्राला काय भूमिका घेणार मग ? शिवसेना म्हणून आमची भूमिका ज्याला जे खायचंय ते खाऊ द्या सरकार म्हणून ढवळाढवळ नकोय” असं सचिन अहिर म्हणाले. “नेते ओघात बोलून जातात. त्यामुळे संयम आणि निकष पाळले पाहिजेत. प्रमोद अप्पा पाटील यांचे बॅनर कुणी लावले हा त्यांचा प्रश्न पण उमेदवारीचा निर्णय हे पक्ष नेतृत्व घेईल” असं सचिन अहिर बोलले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us