अजित दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात.. शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

"एखादा नेत्याचं निधन झाल्यावर बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे, आपली संस्कृती आहे. आता काँग्रेस ज्याप्रमाणे उमेदवार उभा करत आहे, त्यामुळे सुरू असलेल्या परंपरा छेद जात आहे"

अजित दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात.. शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Sanjay shirsat
| Updated on: Apr 06, 2026 | 2:10 PM

“जेव्हा आघाडी होणार होती तेव्हा शेवटपर्यंत, म्हणजेच राष्ट्रवादी उबाठाबरोबर गेली होती. पण काँग्रेसने सांगितलं आम्हाला हायकमांडचा आदेश आला पाहिजे. सात वाजेपर्यंत राज्यपाल यांना पत्र द्यायचे होते. मात्र तरीही काँग्रेसने त्यांना कोणताही होकार दिला नव्हता. काँग्रेस पक्ष इतर पक्षाच्या नव्हे त्यांच्या नीतीवर चालते, त्यावेळी काँग्रेसमुळे आपलं सरकार पडलं हे आता यांना आता जाणवत आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केले. संजय शिरसाट राज्य सरकारमध्ये मंत्री असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार आहेत. “मात्र त्यापूर्वी सहा महिने आधीच हे सरकार पडलं असतं. त्यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणीवपूर्वक तालिका अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. त्यावेळी 12 आमदार काँग्रेसचे निलंबित केले. त्यामुळे या सरकारचं मरण सहा महिने पुढे ढकललं” असं संजय शिरसाट बोलले.

“आमच्या एका मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ज्यांच्यासोबत मी राहिलो त्यांनी मला सडवलं आणि ज्यांच्या विरोधात मी काम केलं त्यांनी मला सन्मान दिला. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागत आहे. आमचा बंड 6 महिने आधीच झाले असते. आमदारांना जे निलंबित केले, त्यामुळे न्यायालयात जावे लागले ना, थोडा गोंधळ केला म्हणून निलंबित केले गेले होते. असे कधी होत नसते. त्यांना निलंबित करण्याचे कारण म्हणजे याचे विकोपा वाढत होता, तो विकोपा दिसू नये म्हणून आधी 12 आमदार कमी केले” असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

Loading...

बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे

“एखादा नेत्याचं निधन झाल्यावर बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे, आपली संस्कृती आहे. आता काँग्रेस ज्याप्रमाणे उमेदवार उभा करत आहे, त्यामुळे सुरू असलेल्या परंपरा छेद जात आहे” असा बारामती पोटनिवडणुकीवर संजय शिरसाट म्हणाले. “पक्षाचा विषय आहे. बॅनर कुणी लावले महाराष्ट्राला माहीत आहे, अजित दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात धुसफुस वाढत आहे” असं शिरसाट म्हणाले.

कुणालाही बदनाम करण्याची प्रथा सुरू झाली आहे

“खऱ्या अर्थाने अंजली दमानिय यांची चौकशी झाली पाहिजे. कुणालाही असे बदनाम करण्याची प्रथा सुरू झाली आहे” असं शिरसाट यांनी सांगितलं. “एलपीजी विषयी कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती, पण म्हणावा तसा परिणाम झाला वाटत नाही. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेणार” असं शिरसाट यांनी सांगितलं. “संजय गायकवाड यांनी केलेला आरोप स्थानिक राजकारणावर आरोप केला असेल, यावर शिंदे आणि फडणवीस योग्य तो निर्णय घेतील” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us