AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द

Islampur Municipal Council : ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द झालं आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का,  जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द
Jayant Patil Big BlowImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 11, 2026 | 9:36 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. 2025 च्या अखेरीस राज्यातील विविध ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार पडल्या होत्या. यात उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचाही समावेश होता. या नगरपरिषदेत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सत्ता मिळवली होती. मात्र आता ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द झालं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राष्ट्रवादीला मोठा धक्का

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द करण्यात आलं आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचं नगराध्यक्ष पद रद्द झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून मलगुडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इश्वरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अतिक्रमण व बांधकाम अनियमित प्रकरणी शिवसेनेच्या घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर निर्णय देताना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आता आगामी काळात नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीची पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतची सर्व माहिती जाधव यांनी माहिती अधिकारात मागवली होती. नंतर ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी अर्ज देण्यात आला होता. आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही इमारत बांधली आहे असा आरोप जाधव यांनी केला होता. आता सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदराव मलगुंडे यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...