‘बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं’, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी नाव न घेता निशाणा साधला.

बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 9:00 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते त्यांच्या मुळगावी दरेगाव येथे बोलत होते. इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही, हे बरोबर आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली, गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेससोबत जायचं नाही हे काँग्रेससोबत गेले, असं हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोले केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिक्कामोर्तब केलं, नकली लोकांना नाकारलं आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना स्विकारलं.  इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही हे बरोबर आहे, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही.
साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस सोबत जायचं नाही हे काँग्रेस सोबत गेले, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  साहेबांचे नकली खोटे आवाज काढून कोणी लोक यांच्याकडे येणार नाहीत.  जर असली असाल तर तुम्हाला नकली आवाज काढण्याची गरज काय?  हा पोरकटपणा आहे, हा थिल्लार पणा आहे. बाळासाहेबांना वेदना देण्याचं, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं हे काम आहे. साहेब असते तर त्यांनी त्यांना चाबकाने फटकारलं असतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

गावाकडे आलो की वृक्ष लागवडीचा माझा कार्यक्रम असतो. गावकऱ्यांना माझं आव्हान आहे शेती भाती वरती अवलंबून न राहता फळझाडे लावली पाहिजेत. एकत्रित येऊन समूह शेती केली तर लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. नागरिकांनी निसर्गाला सांभाळलं पाहिजे निसर्गाचे रक्षण केलं पाहिजे. ती संकल्पनाच आहे, नवीन महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.