AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकाल लागताच भाजपचा एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का, ठाण्यात मोठा ट्विस्ट; घडामोडींना वेग

ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला मोठे यश मिळाले, तर भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. निकालानंतर भाजपने शिंदे गटाला धक्का देत, योग्य मानसन्मान न मिळाल्यास विरोधी बाकांवर बसण्याचा इशारा दिला आहे. युतीमध्ये असूनही भाजपच्या या भूमिकेने ठाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. हे दबावतंत्र असून, शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

निकाल लागताच भाजपचा एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का, ठाण्यात मोठा ट्विस्ट; घडामोडींना वेग
भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
| Updated on: Jan 17, 2026 | 2:25 PM
Share

ठाणे महापालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला घसघशीत यश मिळालं आहे. त्यामुळे शिंदे गटाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवसेना फुटीचा फायदा थेट भाजपला होणार असल्याचंही सांगितलं जात होतं. पण त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाहीये. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाणे महापालिकेत विरोधी बाकांवर बसण्याचा इशाराच भाजपने शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एकत्रितपणे निवडणूक लढवल्यानंतर भाजपने हा इशारा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

ठाणे महापालिकेच्या 131 जागांपैकी शिंदे गटाला 75 तर भाजपला अवघ्या 28 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. तरीही भाजपला अपेक्षित यश गाठता आलेलं नाही. मात्र, निवडणूक संपताच भाजपने वेगळी भूमिका घेण्याचा विचार सुरू केला आहे. योग्य मानसन्मान न मिळाल्यास आम्ही वेगळा विचार करू, असा इशाराच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. केळकर यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती ठाण्यात तुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सत्तेवर अंकूश हवा

योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू. वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू , असं सूचक विधान संजय केळकर यांनी केलं आहे. आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. सर्वांच्या कामकाजाकडे त्यामुळे लक्ष दिलं जाऊ शकतं. सत्तेवर अंकुश ठेवणे महत्वाचे असते, त्यामुळे आम्ही वेगळा विचारू करू, असंही केळकर म्हणाले. तर निवडणुकीत आम्ही जी जी आश्वासने दिली आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, असं भाजपचे आमदार निरंजन डावखरे म्हणाले.

प्रेशर टॅक्टिस ?

दरम्यान, महापालिकेत शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पालिकेत शिंदे गटाची संपूर्ण सत्ता आली आहे. अशावेळी आपल्या पदरात उपमहापौरपद, सुधार समितीसह इतर काही समित्या पाडून घेण्यासाठी भाजपकडून ही प्रेशर टॅक्टिस सुरू केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिंदे भाजपच्या या इशारा आणि प्रेशर टॅक्टिसला जुमानतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे भाजप विरोधी बाकावर बसल्यास शिंदे गटाची मोठी डोकेदुखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...