सत्तराव्या वर्षी प्रेमाचे धुमारे, आजीने केली प्रियकराची हत्या, प्रकरण डीएनएपर्यंत पोहचले,थरारक घटनेने पंचक्रोशी हादरली
सत्तरावे वय म्हणजे संन्यासाश्रमाकडे झुकणारे वय.. या वयात नातवंड खेळवण्याचं आणि हरिहरि करुन देवाचं नाव घेण्याचं वय. पण या वयात दोघाचं एकमेकांशी प्रेम जडले. अनैतिक संबंधात होते तीच गत यातही झाली....

सोलापूर : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. प्रेम ही भावना जागतिक असते. कोणत्याही वयाचा माणूस प्रेमात पडू शकतो. प्रेम ही भावना कोणत्याही वयात येऊ शकते.प्रेमकथांना नेहमीच वाचकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकदा प्रेमातूनही भयंकर गुन्हे घडले आहेत. अनैतिक प्रेमाचे फळे त्या – त्या जोडप्यासह त्यांच्या कुटुंबालाही भोगावी लागतात. पंढरपूरात एका वृद्धाचे दुसऱ्या वृद्धेशी प्रेम संबंध जुळले होते. या प्रेमाच्या घटनेचा शेवट दु:खद झाला आहे.
७० व्या वयातच नातवंड खेळवण्याचे आणि देवाचं नाव घेण्याचे वय. पण या वयात पंढरपूरातील दोन वयोवृद्ध जोडप्याचं एकमेकांशी प्रेम जडले. या प्रेमप्रकरणात या ७० वर्षाच्या वृद्धाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध होते. मात्र, या दोघात वाद झाल्याने मंगल आज्जीने अंबादास खांडेकर यांची हत्या केली. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. ही घटना २७ जुलै रोजी घडली.मात्र, २ ऑगस्ट रोजी अंबादास यांना गावातील लोकांना एक जळलेला मृतदेह काही शेतकऱ्यांना सापडला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ आणि मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु केले.
मंगल होनमाने यांना अटक
दरम्यान, गावातील अंबादास खांडेकर यांनी प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुसरीकडे दीड महिन्यात अंबादास यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए मॅच झाल्याने अंबादास यांची ओळख पटली. त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी तपास करुन मंगल होनमाने यांना अटक केली. प्रेम प्रकरणात झालेल्या भांडणातून 70 वर्षांच्या वृद्ध जोडीदारीची मंगळ आज्जीने हत्या केल्याचे पोलिसांनी तपासात उघड केले. मात्र, या दोघात नेमके भांडण कशावरुन झाले हे कळलेले नाही. पोलिस कारणांचा माग काढत आहेत.