मोठी बातमी! ऑपरेशन टायगर यशस्वी? आता उद्याच…, शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून ऑपरेशन टायगरचा पुरावा मागण्यात आला होता, या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! ऑपरेशन टायगर यशस्वी? आता उद्याच..., शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग
eknath shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 8:50 PM

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं यश मिळालं होतं. पक्षाचे तब्बल 9 खासदार निवडून आले होते. परंतु त्यातील 6 खासदार आता फुटले आहेत. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून, हे सर्व खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता  शिवसेना खासदारांच्या ऑपरेशन टाइगरचा पुरावा समोर येणार आहे.

नवीन गटाचा फोटो आणि प्रमाणपत्र आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून जाहीर केलं जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऑपरेशन टायगरचा पुरवा मागण्यात आला होता.  मात्र कायदेशीर बाबी पूर्ण करून हा पुरावा समोर येईल असे शिंदे गटाकडून सांगण्यात आलं होतं.  लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांच्याकडे गटस्थापन करण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा देखील शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र प्रमाणपत्र आणि फोटो समोर आला नसल्याने शंका उपस्थित केली जात होती.  पण आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी अध्यक्षांच्या ऑफिसमधून या  दोन्ही गोष्टी बाहेर येतील अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे, त्यानंतर दोन दिवसांनी शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या रविवारीच आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला प्रत्यक्षात चारच खासदार उपस्थित होते. तर पाच खासदार हे ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत होता, तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंड केलं. आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार आहेत, तर 6 खासदार हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.

 

Follow Us