आता कोरोना चाचणीसाठी शहरात जायची गरज नाही, वर्ध्यातील ग्रामीण भागात आरटीपीसीआर टेस्टची सोय

| Updated on: May 29, 2021 | 12:34 PM

कोरोना रुग्णांच्या निदानाकरीता आरटीपीसीआर चाचण्यादेखील (Facility of RTPCR test) करण्यात येत आहेत. आता गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांसाठी नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

आता कोरोना चाचणीसाठी शहरात जायची गरज नाही, वर्ध्यातील ग्रामीण भागात आरटीपीसीआर टेस्टची सोय
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

वर्धा : कोरोना रुग्णांच्या निदानाकरीता आरटीपीसीआर चाचण्यादेखील (Facility of RTPCR test) करण्यात येत आहेत. आता गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांसाठी नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातही आरटीपीसीआरकरिता स्त्राव संकलन करत कोरोना रुग्णांचे निदान केले जाणार आहे (Facility of RTPCR test in rural areas of Wardha).

मागील वर्षभरापासून कोरोनाच्या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. उपाययोजनांसोबतच चाचण्या वाढविण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाच्या अँटिजेन, आरटीपीसीआर अशा दोन पद्धतीच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट, आर्वीचे उपजिल्हा रुग्णालय, सेवाग्राम, सावंगी, ग्रामीण रुग्णालयातच आरटीपीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध होती. काही प्रसंगी शिबिर घेऊन तपासणी केली जायची. शहरानंतर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आरटीपीसीआर चाचणीसाठी स्त्राव घेण्याची सुविधा उपलब्ध करण्याची गरज पुढे येऊ लागली. त्या अनुषंगाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरटीपीसीआर चाचणीसाठी स्त्राव घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यामुळे नागरिकांचा शहरस्थळी जावून चाचणी करण्याचा त्रास कमी होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत ही सुविधा उपलब्ध झाल्याने त्या केंद्राच्या परिसरातील गावांतील रुग्णांचे निदान करण्यास मदत होणार आहे.

27 आरोग्य केंद्रांत याबाबत प्रशासनाच्या वतीने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे स्त्राव घेऊन सेवाग्राम, सावंगी येथील प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात येणार आहे.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडूनही याकरीता हातभार लावण्यात आला आहे. या सुविधेकरिता संस्थेकडून आठ लाख रुपये उपलब्ध करण्यात आलेत. रोज किमान 50 चाचण्या व्हाव्यात, असे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

नागरिकांनी चाचणी करून घ्यावी : ओम्बासे

आरोग्य वर्धिनी केंद्रांत आरटीपीसीआर चाचणीसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यातून ग्रामीण भागातील रुग्णांचे निदान लवकर होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी तपासणी करुन घ्यावी, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केली.

Facility of RTPCR test in rural areas of Wardha

संबंधित बातम्या :

कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा, आमदार राजू पारवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘तीन दिवसात कारणे दाखवा, अन्यथा…’, जैविक कचरा उघड्यावर फेकून कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या रुग्णालयाला नोटीस