‘तीन दिवसात कारणे दाखवा, अन्यथा…’, जैविक कचरा उघड्यावर फेकून कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या रुग्णालयाला नोटीस

कोरोना रुग्णालयाती जैविक कचरा हा घातक असतो. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणं जास्त आवश्यक असतं (Notice to hospital who throwing bio medical garbage in open).

'तीन दिवसात कारणे दाखवा, अन्यथा...', जैविक कचरा उघड्यावर फेकून कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या रुग्णालयाला नोटीस
'तीन दिवसात कारणे दाखवा, अन्यथा...', कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या रुग्णालयाला नोटीस

बुलडाणा : कोरोना रुग्णालयाती जैविक कचरा हा घातक असतो. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणं जास्त आवश्यक असतं. मात्र, कोरोना रुग्णालयातील हाच कचरा रस्त्यावर उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार 24 मे रोजी बुलडाण्यात उघड झाला होता. याप्रकरणी शहरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. याशिवाय या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषद अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता (Notice to hospital who throwing bio medical garbage in open).

जैविक कचरा संचेती कोविड हॉस्पिटलचा

नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात रस्त्यावरचा जैविक कचरा हा संचेती कोविड हॉस्पिटलचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी नगरपरिषदेने संचेती हॉस्पिटलला तीन दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असं नगरपरिषदेने सांगितलं आहे (Notice to hospital who throwing bio medical garbage in open).

अज्ञातांकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रस्त्यावर उघड्यावर ज्या भागात जैविक कचरा टाकण्यात आला आहे त्याठिकाणी भंगार गोळा करणाऱ्या व्यक्ती मास्क आणि हॅन्डग्लोज न वापरता यामधून भंगार गोळा करत असल्याचं स्थानिकांना दिसलं. तसेच यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही स्थानिकांनी म्हटलं आहे. दरम्यान, नगरपरिषद अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देताच रात्रीतून हे सर्व वेस्टेज साहित्य जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील अज्ञातांकडून करण्यात आला.

आरोग्य निरीक्षकाकडून हॉस्पिटलची पाठराखण?

नगरपरिषद मुख्याधिकारी स्वप्नील लगाने यांच्यासह आरोग्य निरीक्षक सुनील बेडवाल यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये या वेस्टेज मटेरियलमध्ये संचेती कोविड हॉस्पिटलचे पुरावे आढळले. तरीही आरोग्य निरीक्षक सुनील मात्र कुठलेही पुरावे आढळले नसल्याचे सांगत आहेत. यातून ते रूग्णालयाला पाठीशी घालत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.

सर्वसामान्यांकडून कारवाईची मागणी

जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती चैन खंडित करण्याच्या अनुषंगाने कठोर पावले उचलत आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा हा प्रकार घडत आहे. संबंधित प्रकार हा दंडनीय अपराध असून असे कृत्य करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई व्हावी, जेणेकरून असे अपघात वारंवार घडणार नाहीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी केली आहे.

हेही वाचा : पैसे द्या, दुकानाविरुद्ध तक्रारी मिटवा, अँटीकरप्शनच्या नावे तोतया अधिकारी, रत्नागिरीत तिघांना अटक