ती तरुणाच्या आकंठ प्रेमात बुडाली, घरच्यांकडून थेट प्रायव्हेट फोटो व्हायरल, बहिणीनेच…कल्याणमध्ये धक्कादायक घटना!

तिचा मोबाईल हिसकावण्यात आला. तसेच तिला कागदपत्रं न देताच घराबाहेर काढण्यात आलं. तरुणीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी करण्याचाही आरोप करण्यात आलाय.

ती तरुणाच्या आकंठ प्रेमात बुडाली, घरच्यांकडून थेट प्रायव्हेट फोटो व्हायरल, बहिणीनेच...कल्याणमध्ये धक्कादायक घटना!
love marriage and kalyan story
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 10:27 AM

Love Story : प्रेमाला देश, प्रांत, जात, धर्माची सीमा नसते. कधी कोणावर प्रेम होईल हे सांगता येत नाही. परंतु आपल्या समाजात प्रेमाला आजही अनेक निषिद्ध मानलं जातं. आम्ही ज्याच्यासोबत लग्न लावून देऊ, त्याच्यासोबतच आमच्या मुला-मुलींनी आयुष्यभर संसार केला पाहिजे, असा अनेक पालकांचा हट्ट असतो. आपल्या मुलांनी कोणावर तरी प्रेम केलंय, ही कल्पानाच मुळात अनेकांना आडत नाही. मुलापेक्षाही मुलीवर जास्त बंधनं लादली जातात. आपल्या मुलीने एखाद्या तरुणावर प्रेम केलंय, हे समजताच अनेक ठिकाणी तिला घरात डांबलं जातं, तिच्या इच्छेविरुद्ध कुठेतरी लग्न लावून दिलं जातं. काह ठिकाणी तर प्रेम करणाऱ्या मुलीचा निर्घृणपणे जीव घेतल्याच्या धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. सध्या प्रेमाला विरोध करणारा असाच एक अजब प्रकार समोर आलाय. घरच्यांनी विरोध केल्याने संबंधित तरुणीनेही धक्कादायक पाऊल उचललं आहे.

नेमकं काय घडलं?

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरच्यांनी एका तरुणीच्या प्रेमविवाहाला विरोध केलाय. बहिणीकडून तिला जबर मारहाण करण्यात आलीय. सोबतच तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिचा मानसिक छळ करण्यात आलाय. या घटनेमुळे संबंधित तरुणीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केलाय.

Loading...

संबंधित तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते. परंतु या प्रेमाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. घरच्यांचा विरोध झुगारून संबंधित तरुणी प्रेमविवाह करणार होती. त्यासाठी कोर्ट मॅरेज करण्यासाठी तिला काही कागदपत्रांची आवश्यकता होती. हे कागदपत्रं घेण्यासाठी तरुणी आपल्या घरी गेली होती. परंतु तिच्या बहिणीने तिला जबर मारहाण केली. तसा आरोप करण्यात आलाय.

तिचा मोबाईल हिसकावण्यात आला. तसेच तिला कागदपत्रं न देताच घराबाहेर काढण्यात आलं. तरुणीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी करण्याचाही आरोप करण्यात आलाय. याच सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संबंधित तरुणीने फिनाईल पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु तिच्या होणाऱ्या पतीने वेळीच तिला रुग्णालयात नेले. त्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. या प्रकरणी आता महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us