भाजपा नेत्या नवनीत राणा यांना भेटण्यासाठी 1200 किमी चाहत्याचा पायी प्रवास, अमरावतीत येत..

नवनीत राणांच्या भेटीसाठी चाहत्याची तब्बल 1200 किमीची पायी वारी केली. निजामाबादहून चालत हा तरूण अमरावतीमध्ये पोहोचला. गेल्या 15 दिवसांपासून तो चालत चालत अमरावतीला पोहोचला. नवनीत राणा यांना भेटल्यानंतर त्याचा आनंद गगणात मावत नव्हता.

भाजपा नेत्या नवनीत राणा यांना भेटण्यासाठी 1200 किमी चाहत्याचा पायी प्रवास, अमरावतीत येत..
Navneet Rana
| Updated on: Nov 22, 2026 | 7:46 AM

अमरावती भाजप नेत्या नवनीत राणांच्या भेटीसाठी चाहत्याची तब्बल 1200 किमीची पायी वारी केली. 1200 किलो मीटर चालत हा चाहता नवनीत राणा यांना भेटण्यासाठी अमरावतीत पोहोचला. आंध्रप्रदेशच्या या तरूणाचे नाव शेखर नायडू आहे. 1200 किलो मीटरचा प्रवास करून तो अमरावतीत नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोहोचला आहे. भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या अभिनेत्री होत्या. काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका देखील केल्या आहेत. रवी राणा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी चित्रपट सोडून राजकारणात प्रवेश केला. नवनीत राणा त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. संसदेतील धडाकेबाज भाषणाचे त्यांचे अनेक व्हिडीओही पुढे आली आहेत.

श्रीकाकुलम जिल्ह्यातील राजम गावचे रहिवासी असलेल्या शेखर नायडू यांनी निजामाबाद ते अमरावती असा 15 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करत अमरावतीत नवनीत राणा यांची भेट घेतली. आपल्या आवडत्या नेत्याला प्रत्यक्ष भेटल्यानंतर शेखर नायडू यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी आपला आनंद शब्दात बोलून दाखवला.

Loading...

या भेटीचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नसल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.विरोधकांची भाषणे सुद्धा ऐका, सभागृहात वेळेवर हजर राहा. शिवसेना शिंदे पक्षाकडून मुंबईतील नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत.  प्रस्तावांवरील मतदानावेळी सत्ताधाऱ्यांची नामुष्की टाळण्यासाठी सभागृहाची वेळ पाळण्याचे व कामकाज संपेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश दिली आहेत.

मुंबई महापालिकेतील शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांची एक आढावा बैठक पार पडली. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी नगरसेवकांना या महत्वाचा सूचना देण्यात आल्या आहेत.

नगरसेवकांनी सभागृहात वेळेत उपस्थित राहावे, शेवटपर्यंत सभागृहात बसावे आणि विरोधकांची भाषणेही लक्षपूर्वक ऐकावी, अशा सूचना यावेळी नगरसेवकांना करण्यात आल्या आहेत. बऱ्याचदा सभा सुरू असते आणि नगरसेवक निघून जातात. विरोधकांची भाषणे लक्षपूर्वक ऐका अशा सूचना या देण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us