Shirdi : शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिर्डी साई संस्थानचा चांगला निर्णय
Shirdi : भविष्यात NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन आणि सुविधा सुरू करण्याची तयारी संस्थानने दर्शवलीय.

शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे उद्धवस्त झालेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाबाबत शिर्डी साईबाबा संस्थानने चांगला निर्णय घेतला आहे. या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी साईबाबा संस्थान पुढे सरसावले आहे. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, 10 वीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वीचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाणार आहे. एवढेच नव्हे, तर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची असलेली CET ची फी देखील साईबाबा संस्थान भरणार आहे.
भविष्यात NEET आणि JEE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन आणि सुविधा सुरू करण्याची तयारी संस्थानने दर्शवलीय. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली.
मंत्री उदय सामंत अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर
“अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आलेले मंत्री उदय सामंत यांनी गट प्रमुख ते जिल्हा प्रमुख पर्यंत रिक्त पदे भरणार असल्याचं सांगितलं. पालकमंत्र्यांना भेटून शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला स्थान देणार. महायुतीच्या समन्वय समितीत ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणार” असं उदय सामंत म्हणाले.
संगमनेर सह जिल्ह्यात MIDC उभी करणार
“उद्योग विभागाला निधीची जास्त गरज पडत नाही. महामंडळातून आम्ही निधी उभा करतो. दोन ते तीन महिन्यात संगमनेर सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी MIDC उभी करणार” असं उदय सामंत म्हणाले.
शक्ती कायदा लागू झालाच पाहिजे
“शक्ती कायद्याला विधानसभेने एकमताने मंजुरी दिलेली आहे.आम्ही देखील याबाबत पाठपुरावा करतोय. शक्ती कायदा लागू झालाच पाहिजे अस आमचे मत आहे” असं उदय सामंत म्हणाले.
हिंदी भाषा पेपरवर काय बोलले?
“प्रधान सचिवांना न विचारता मंत्रालयातून पत्र काढण्यात आले. ते समोर येताच ती परीक्षा मी रद्द केलीय. 1976 मधील परिस्थिती वेगळी होती. हिंदीची परीक्षा कशासाठी घेतली जात होती याचा आढावा घेऊ. आवश्यकता नसेल तर ही परीक्षा पूर्णपणे रद्द करणार” असं मंत्रालयातील हिंदी भाषा पेपर सक्तीवर उदय सामंत बोलले.