AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वीच्या अभ्यासक्रमात ऐश्वर्या रायचं ‘निंबूडा-निंबूडा गाणं? पुस्तकातील गाण्यामुळे मोठा गदारोळ, इतके अधिकारी निलंबित

मुलांच्या अभ्यासक्रामात योग्य आणि त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, असे धडे आणि कविता असव्यात... अशी अपेक्षा असते. पण येथे तर 5 वीच्या अभ्यासक्रात थेट अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचं हिट गाणं असल्याचं आढळलं आहे... ज्यावर मोठी कारवाई देखील करण्यात आली आहे.

5 वीच्या अभ्यासक्रमात ऐश्वर्या रायचं 'निंबूडा-निंबूडा गाणं? पुस्तकातील गाण्यामुळे मोठा गदारोळ, इतके अधिकारी निलंबित
Aishwarya Rai
| Updated on: Jun 30, 2026 | 7:59 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय या बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत. ऐश्वर्याने अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. पण आता ऐश्वर्याच्या एका गाण्यामुळे सर्वत्र गदारोळ निर्माण झाला आहे. ऐश्वर्याचं हिट गाणं ओडिशामधील एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलं असून, त्यातील लिरिक्स राज्यातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत. यामागची सविस्तर माहिती आणि नेमके प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या…

ओडिशात इयत्ता 5 वीच्या पाठ्यपुस्तकात ‘निंबूडा-निंबूडा’ गाण्याचा समावेश

ओडिशामध्ये इयत्ता 5 वीच्या पाठ्यपुस्तकात ‘निंबूडा-निंबूडा’ या गाण्याचे बोल अनावधानाने समाविष्ट करण्यात आले आहेत. ही बाब पुस्तके शाळांपर्यंत पोहोचल्यानंतर उघडकीस आली; यामुळे शाळा प्रशासन तसेच संपादकीय आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याप्रकरणी सध्या अधिक चौकशी सुरु आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडीओ…

‘ओडिशा टीव्ही’च्या (OTV) च्या एका रिपोर्टनुसार, या पुस्तकातील काही पानांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही चूक उघडकीस आली. या घटनेमुळे वाद निर्माण झाला असून, सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून यावर तीव्र टीका केली जात आहे. संपादकीय गुणवत्ता तपासणीदरम्यान इतकी मोठी चूक कशी काय झाली, असा प्रश्न एजुकेशन एक्सपर्ट आणि पालकांनी उपस्थित केला आहे. मात्र, या प्रकरणाबाबत संबंधित अधिकारी किंवा शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही…

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ, जेव्हा पुस्तकातील गंभीर चुका समोर आल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020अंतर्गत राज्यात सुरू करण्यात आलेल्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये 1 हजार 600 हून अधिक त्रुटी आढळल्या. इयत्ता पहिली ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वस्तुस्थितीविषयक चुका, चिन्हे, व्याकरण आणि शब्दलेखन अशा एकूण 1 हजार 678 त्रुटींची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक, म्हणजेच 705 त्रुटी इयत्ता आठवीच्या पुस्तकांमध्ये आढळल्या आहेत.

अधिकाऱ्यांना करण्यात आलं निलंबित

मीडिया रिपोर्ट्सनुसार, , या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे (SCERT) माजी संचालक मनोज पाढी आणि तीन सहाय्यक संचालकांना निलंबित केलं आहे. दरम्यान, विकास आयुक्त डी. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांची करण्यात आलेल्या चौकशीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा