आता शेतकऱ्यांनी एकही रुपया द्यायचा नाही, मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठं विधान केलं आहे. आम्ही संपूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

आता शेतकऱ्यांनी एकही रुपया द्यायचा नाही, मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय
Manoj Jarange Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 8:49 PM

राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दुसरीकडे मात्र अशी परिस्थिती असताना देखील मायक्रो फायन्स कंपन्यांकडून आपलं कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याचा मृतदेह मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळून आला होता. ही घटना समोर येताच राज्यभरात तीव्र संतापाची लाट पसरली. यावर  प्रतिक्रिया देताना आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील चांगलाच संताप व्यक्त केला आहे. तसेच शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की  आत्महत्या करू नका, दुष्काळाचं हेही संकट जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

Loading...

नांदेडमध्ये  शेतकऱ्याचा एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळला होता. त्या कुटुंबाची मी भेट घेणार आहे. हा विषय सरकार दरबारी लावून धरणार आहे.  संकट आपल्या पाठीलाच पूजली आहेत. शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका. दुष्काळाचं हेही संकट जाईल, आत्महत्या करू नका.  तुमच्या पाया पडतो, लेकरा बाळाचे खूप  हाल होतात, असं भावनिक आवाहान यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.  दरम्यान आम्ही ताकतीने शेतकरी कुटुंबांसोबत लढणार आहोत.  फायनान्सवाल्यांना रुपया द्यायची गरज नाही. बघू कोण येतं ते? महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याने पैसे भरण्याची गरज नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने एका महिलेला शिविगाळ केल्याचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, यावर देखील यावेळी जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हवेचा रुख कधी बदलेल हे सांगता येत नसतं, आता दिल्लीपर्यंत पळण्याची वेळ आली.  तु जितका दुसऱ्याला कमजोर समजशील तितके तुझे लोक आत जातील, असा इशारा या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी वाल्मिक कराडला दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us