AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भजन गाणाऱ्या गायिकेने गायलं माधुरीचं सर्वात बोल्ड गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही लोक याच गाण्याचे चाहते

भजन गाणाऱ्या गायिकेने गायलेले अभिनेत्री माधुरी दीक्षितचं सर्वात बोल्ड गाणं. सुपरहिट होताच गाण्यावर झालेला संगीत चोरीचा आरोप. आजही हे गाणं प्रचंड लोकप्रिय.

भजन गाणाऱ्या गायिकेने गायलं माधुरीचं सर्वात बोल्ड गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही लोक याच गाण्याचे चाहते
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 02, 2026 | 8:56 PM
Share

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही तर अप्रतिम नृत्य आणि चेहऱ्यावरील हावभावांसाठीही ओळखली जाते. 90 च्या दशकात तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यापैकी एक गाणे म्हणजे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेटा’ चित्रपटातील ‘धक-धक करने लगा’. आजही लोकप्रिय असलेल्या या गाण्याने त्यावेळी प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, या गाण्याभोवती संगीत चोरीचा आरोप आणि वादही निर्माण झाला होता.

‘धक-धक करने लगा’ हे गाणे प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायले होते. विशेष म्हणजे, भक्तिगीते आणि भजनांसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुराधा पौडवाल यांनी या गाण्यातील आपल्या आवाजाने श्रोत्यांवर वेगळीच छाप पाडली. अनुराधा पौडवाल यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत हिंदीसह विविध भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. ‘धक-धक करने लगा’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचे तीन पुरस्कार मिळाल्याचा उल्लेखही केला जातो.

माधुरी आणि अनिल कपूर यांच्या जोडीची जादू

1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेटा’ चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अनुपम खेर आणि अरुणा इराणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘धक-धक करने लगा’ हे गाणे माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. माधुरीच्या नृत्यशैलीने आणि आकर्षक अदांनी या गाण्याला विशेष लोकप्रियता मिळवून दिली.

या गाण्याचे बोल समीर यांनी लिहिले होते, तर संगीत आनंद-मिलिंद या जोडीने दिले होते. गाण्याच्या बोलांवरूनही त्यावेळी चर्चा आणि वाद निर्माण झाले होते.

संगीत चोरीचा आरोप

‘धक-धक करने लगा’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर संगीतकार आनंद-मिलिंद यांच्यावर दुसऱ्या गाण्याची धून कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला होता. वृत्तांनुसार, माधुरी दीक्षितच्या या गाण्यापूर्वी 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘जगदेका वीरुडु अथिलोका सुंदरी’मध्ये ‘अब्बानी-टियानी’ हे गाणे होते. या गाण्यावर श्रीदेवी आणि चिरंजीवी झळकले होते.

दोन्ही गाण्यांच्या चालींमध्ये साम्य असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. मात्र, श्रीदेवीवर चित्रित झालेले गाणे माधुरीच्या ‘धक-धक’ गाण्याप्रमाणे बोल्ड किंवा सेंसुअस अंदाजात चित्रित करण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे, सुरुवातीला या आरोपांवर मौन बाळगणाऱ्या आनंद-मिलिंद यांनी अनेक वर्षांनंतर मेकर्सच्या दबावामुळे संगीताची नक्कल केल्याचे मान्य केल्याचे वृत्त आहे.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद