AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lalit Prabharkar Prahaar : ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ आता OTT वर पाहता येणार; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

ललित प्रभाकरचा 'प्रहार' हा जर कोणी पाहिला नसेल तर अशा चाहत्यांसाठी आता हा सिनेमा OTT वर रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे हि ललितच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. OTT वर चित्रपट कुठे आणि कधी पाहता येईल, जाणून घ्या.

lalit Prabharkar Prahaar :  ललित प्रभाकरचा 'प्रहार' आता OTT वर पाहता येणार; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या
lalit prabhkar prahaar
| Updated on: Nov 02, 2026 | 9:05 PM
Share

चित्रपटगृहात जाऊन प्रहार पाहायचा राहून गेला असेल, आपल्या लाडक्या ललितला कसाबच्या भूमिकेत पाहायचे राहून गेले असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. आता प्रहार हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर, राजकुमार राव यांचा ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

‘प्रहार’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अविनाश अरूण यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव याने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे, तर ललित प्रभाकर याने कसाबची भूमिका साकारली आहे. याशिवाय इतरही दमदार कलाकारांची फळी आहे. उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यातील गाजलेल्या खटल्यापैकी हा एक खटला आहे.

‘प्रहार’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. जीक्यू इंडियाच्या वृत्तानुसार चित्रपटाच्या सुरूवातीच्या क्रेडिट्समध्ये नेटफ्लिक्सचा लोगो दिसतो. त्यामुळे नेटफ्लिक्स हे या चित्रपटाचं डिजीटल व्यासपीठ असण्याची शक्यता आहे. मात्र निर्माते आणि नेटफ्लिक्स या दोघांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

साधारणपणे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी चित्रपट OTT वर येतात. याच अंदाजानुसार ‘प्रहार’ 27 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2026 या कालावधीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊ शकतो. मात्र ही तारीख निश्चित नसून केवळ संभाव्य कालावधी आहे.

चित्रपटात कोणते कलाकार आहेत?

ललित प्रभाकर यांच्यासोबत राजकुमार राव, वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिंकदर खेर, आशिष विद्यार्थी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वामिका गब्बी यांनी ज्योती निकम यांची, तर जयदीप अहलावत यांनी पाकिस्तानी सरकारी वकिल चौधरी झुल्फिकार अली यांची भूमिका साकारली आहे.अभिनेता ललित प्रभाकरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे.

चित्रपटाची कथा 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित सत्य घटनांवर आधारित आहे. यामध्ये 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यापासून अजमल कसाबच्या खटल्यापर्यंतच्या महत्त्वाच्या कायदेशीर लढायांचा समावेश आहे

त्यामुळे चित्रपटगृहात ‘प्रहार’ पाहू न शकलेल्या प्रेक्षकांना आता OTT प्रदर्शनाची प्रतिक्षा आहे. मात्र नेटफ्लिक्सवरील रिलीजची तारीख अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नाहीp

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद