शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, जमीन मोजणी प्रक्रिया बंद पाडली, पोलीस अन् शेतकऱ्यांमध्ये झटापट
सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शक्तिपीठ महामार्गाला अजूनही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांकडून या महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. यावेळी मोजणी प्रक्रिया बंद पाडल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाल्याचं पहायला मिळालं.

सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शक्तिपीठ महामार्गाला अजूनही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांकडून या महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. तिसऱ्या दिवशीही विरोध कायम असून आता शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र याला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोजणी प्रक्रिया रोखून धरल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचं पाहयला मिळालं. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापलं आहे.
शक्तिपीठ माहामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या महामार्गाला सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. मोजणी प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन मोजणी प्रक्रिया रोखून धरली आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
पोलीस बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया
खानापूर तालुक्यातल्या भाळवणी येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये प्रशासनाकडून मोजणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून जमीन मोजणीला जोरदार विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी जमीन मोजणी प्रक्रिया रोखल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचं पाहयला मिळालं.
अनेक शेतकरी ताब्यात
दरम्यान शेतकऱ्यांकडून मोजणी प्रक्रियेला विरोध होत असून, शेतकऱ्यांनी काही ठिकाणी मोजणी प्रक्रिया बंद पाडली आहे. प्रशासनाकडून या महामार्गासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र असं असातना देखील शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीयेत. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट देखील झाली. त्यानंतर पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात देखील घेतलं आहे, मात्र काहीही झालं तरी आम्ही मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे.