AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, जमीन मोजणी प्रक्रिया बंद पाडली, पोलीस अन् शेतकऱ्यांमध्ये झटापट

सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शक्तिपीठ महामार्गाला अजूनही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांकडून या महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. यावेळी मोजणी प्रक्रिया बंद पाडल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाल्याचं पहायला मिळालं.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, जमीन मोजणी प्रक्रिया बंद पाडली, पोलीस अन् शेतकऱ्यांमध्ये झटापट
शक्तिपीठविरोधात शेतकरी आक्रमक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 2:43 PM
Share

सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शक्तिपीठ महामार्गाला अजूनही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांकडून या महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. तिसऱ्या दिवशीही विरोध कायम असून आता शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र याला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोजणी प्रक्रिया रोखून धरल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचं पाहयला मिळालं. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापलं आहे.

शक्तिपीठ माहामार्गासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या महामार्गाला सांगली जिल्ह्यात  शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. मोजणी प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन मोजणी प्रक्रिया रोखून धरली आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

पोलीस बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया  

खानापूर तालुक्यातल्या भाळवणी येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये प्रशासनाकडून मोजणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून जमीन मोजणीला  जोरदार विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी जमीन मोजणी प्रक्रिया रोखल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचं पाहयला मिळालं.

अनेक शेतकरी ताब्यात 

दरम्यान शेतकऱ्यांकडून मोजणी प्रक्रियेला विरोध होत असून, शेतकऱ्यांनी काही ठिकाणी मोजणी प्रक्रिया बंद पाडली आहे. प्रशासनाकडून या महामार्गासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र असं असातना देखील शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीयेत. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट देखील झाली. त्यानंतर पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात देखील घेतलं आहे, मात्र काहीही झालं तरी आम्ही मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

Follow Us
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?